ईशा देओल राजकारणात नशीब आजमवणार? हेमा मालिनी यांनी स्पष्टचं सांगितले

Esha Deol To Join Politics: बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यामुळं चर्चेत आहे. भरत तख्तानीसोबत तिचा घटस्फोट झाल्यानंतर ती आता नव्याने आयुष्य सुरू करणार आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 17, 2024, 05:07 PM IST
ईशा देओल राजकारणात नशीब आजमवणार? हेमा मालिनी यांनी स्पष्टचं सांगितले title=
hema malini Esha Deol likely to political career after separation with husband

Esha Deol To Join Politics: बॉलीवूड अभिनेत्री ईशा देओल सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळं चर्चेत आहे. ईशा आणि भरत तख्तानी यांचा घटस्फोट झाल्याचे समोर येतेय. अशावेळी ईशाने काही वर्षांपूर्वी केलेली विधाने आणि नवीन मुलाखती सातत्याने समोर येत आहेत. अलीकडेच ईशा देओलची आई आणि ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी ईशाबाबत केलेले एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आले आहे. हेमा मालिनी यांना अलीकडेच एका मुलाखतीत ईशाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. ईशा राजकारणात येऊ शकते का? या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं आहे. 

हेमा मालिनी यांनी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात काम केले आहे. कालांतराने त्यांनी राजकारकडे पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. अलीकडेच एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांना ईशा आणि अहाना यांना राजकारणाबद्दल काय वाटतं आणि त्यांना राजकारणात यायचंय का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी त्यांची इच्छा असेल तर, असं उत्तर दिलं होतं. 

हेमा मालिनी यांनी पुढे म्हटलं आहे की, ईशा येत्या काही वर्षात राजकारणात दिसू शकते. कारण तिला त्याबाबत आवड आहे. ईशा यासाठी खूप जास्त उत्सुक आहे. जर तिला इच्छा असेल तर ती निश्चितच राजकारणात येऊ शकते. हेमा मालिनी यांच्या उत्तरावर आता ईशा राजकारणात येऊ शकते, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. 

हेमा मालिनी यांना आणखी प्रश्न विचारण्यात आला होता की, तुम्ही राजकारणात आहात याचे समर्थन तुम्हाला कुटुंबाकडून मिळतं का? त्यावर त्यांनी उत्तर दिलं आहे की, त्यांच्यामुळं मी आज हे काम करण्यास सक्षम आहे. ते मुंबईत माझ्या घराची काळजी घेत आहेत. म्हणूनच मी मथुरेत येऊ शकते. मी आज जे काही करते त्यात धरम जींना खूप खुश आहेत. ते मला प्रोत्साहन देण्यासाठी कधी कधी मथुरेतदेखील येत आहे. 

ईशा देओलचा घटस्फोट

ईशा देओल आणि उद्योजक भरत तख्तानी यांनी लग्नाच्या 11 वर्षांनंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. ईशा आणि भरत यांचे 2012 रोजी लग्न झाले होते.  या दोघांनाही दोन गोंडस मुली असून त्यांचे नाव राध्या आणि मिराया आहे. भरत आणि ईशा हे बॉलिवूडचे बेस्ट कपल ओळखले जायचे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात काहीच अलबेल नसल्याचे समोर आले होते. दोघांनी एकमेकांसोबतचे फोटोदेखील शेअर करणे बंद केले होते. अनेक पार्ट्यांमध्येही ईशा यावेळी हेमा मालिनी यांच्यासोबत दिसली होती.