ओटीटीची बोल्ड क्विन सरला भाभीचा हॉट अंदाज, वेब सीरिजमध्ये ओलांडली बोल्डनेसची हद्द

अनेक अभिनेत्रींनी ओटीटीवर बोल्डनेसची अशी जादू निर्माण केली की आज चाहत्यांना त्यांचे वेड लागलं आहे. 

Updated: May 5, 2022, 07:47 PM IST
ओटीटीची बोल्ड क्विन सरला भाभीचा हॉट अंदाज, वेब सीरिजमध्ये ओलांडली बोल्डनेसची हद्द title=

मुंबई : ओटीटीच्या माध्यमातून सर्व लहान-मोठ्या कलाकारांना त्यांच्यातील कौशल्य दाखवण्याची संधी दिली. ज्या स्टार्सना चित्रपटांमध्ये चांगली संधी मिळाली नाही, त्यांनी ओटीटीमधून नाव कमावलं आणि ते लोकप्रिय झाले. अनेक अभिनेत्रींनी ओटीटीवर बोल्डनेसची अशी जादू निर्माण केली की आज चाहत्यांना त्यांचे वेड लागलं आहे. (hot actress rajsi verma bold look in many web series sarla bhabhi)

या अभिनेत्रींनी बोल्डनेसच्या मर्यादा ओलांडल्या. यापैकी एक म्हणजे (Rajsi Verma) राजसी वर्मा. जिला सरला भाभी म्हणूनही ओळखलं जातं. मुंबईत जन्मलेली आणि लहानाची मोठी झालेली राजसी वर्मा 2016 मध्ये 'बेमन लव्ह' सिनेमातही दिसली होती.
 
त्याआधी ती 2018 मध्ये विक्रम भट यांच्या 'तंत्र' या वेब सीरिजमध्ये दिसली होती. यानंतर राजसीने स्वत:ला आटीटीसाठी वाहून घेतलं. राजसीने एकसेएक हॉट वेबसीरिजमध्ये बोल्ड भूमिका साकारल्या.

राजसीने ओटीटीवर 'चरमसुख', 'बायोलॉजी टीचर' आणि 'पलंगतोड डबल धमाका' यासारख्या वेबसीरिजमध्ये काम केलं. राजसीने 2019 मध्ये उल्ल एपवरील वेबसीरिज चरमसुख (मॉम एंड डॉटर) आणि 'चरमसुख सौतेला प्यार'च्या माध्यमातून जबरदस्त लोकप्रियता मिळाली. 

सरलाने या वेबसीरिजमधून हॉटनेस आणि बोल्ड अंदाज दाखवला की पाहणारे थक्क झाले. सरलाचे चाहते तिच्या आगामी वेबसीरिजची आवर्जून वाट पाहतात. 

राजसीने स्टार प्लसचा लोकप्रिय शो 'दिया और बाती हम'मध्ये काम केलंय. तसेच तिने 'क्राईम पेट्रोल', 'सावधान इंडिया', 'ये है मोहब्बतें', 'कसम तेरे प्यार की', 'सुहानी सी एक लडकी' आणि 'ए जिंदगी' सारख्या शोमध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत. ती खऱ्या आयुष्यातही खूप बोल्ड आहे.