प्ले बॉय मासिकेचे संस्थापक ह्यू हेफनर यांचं निधन

1953 साली हेफनर यांनी प्ले बॉय मासिक सुरू केलं, आणि लवकर प्ले बॉय नावाचा ब्रँड अमेरिकेतला सर्वात मोठा ब्रँड बनला. 

Updated: Sep 28, 2017, 02:45 PM IST
प्ले बॉय मासिकेचे संस्थापक ह्यू हेफनर यांचं निधन title=

न्यूयॉर्क :  प्ले बॉय मासिकेचे संस्थापक ह्यू हेफनर यांचं निधन झालंय. ते 91 वर्षाचे होते. हेफनर यांचा मृत्यू वार्ध्यक्यानं झाल्याचं प्लेबॉयच्या व्यवस्थापनानं म्हटलंय.  1953 साली हेफनर यांनी प्ले बॉय मासिक सुरू केलं, आणि लवकर प्ले बॉय नावाचा ब्रँड अमेरिकेतला सर्वात मोठा ब्रँड बनला. 

प्ले बॉयनं अमेरिकन तरुण पुरुषांना स्वतंत्र जगण्याची नवी व्याख्या दिली.  प्ले बॉय मासिक दर महिन्याला विवस्त्र तरुणींची छायाचित्र प्रसिद्ध होतं.  या छायाचित्रासाठी तत्कालीन अमेरिकन तरुण अक्षरशः वेड लावलं...हेफनर यांनी अमेरिकेत लैंगिक संबंध आणि अभिव्यक्ती स्वांतत्र्याच्या चळवळींना नवे आयम दिले. 

मुक्त जीवनाचा नवा अध्याय अमेरिकन समाजात रुजवला. अवघ्या सहाशे डॉलर्सच्या गुंतवणूकीतून उभ्या केलेल्या प्ले बॉय मासिकातून तयार झालेल्या ब्रँडची किंमत आज अब्जावधी डॉलर्सच्या घरात आहेत.