'पद्मावती' वादावर पहिल्यांदाच बोलला शाहिद कपूर

अखेर 'पद्मावती' वादावर अभिनेता शाहिद कपूरने मौन सोडलं आहे. 

Updated: Nov 20, 2017, 05:58 PM IST
'पद्मावती' वादावर पहिल्यांदाच बोलला शाहिद कपूर  title=

नवी दिल्ली: अखेर 'पद्मावती' वादावर अभिनेता शाहिद कपूरने मौन सोडलं आहे. 

शाहिदने पद्मावती या सिनेमात राजा रतन सिंहची भूमिका साकारली आहे. त्याने सिनेमाच्या या वादावर असे म्हटले आहे की, 'आपल्या संविधानात असे सांगितले आहे की, आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला दोषी मानलं जाऊ शकत नाही'. 
आणि हीच गोष्ट पद्मावती सिनेमाच्या बाबतीत ही लागू पडत आहे. सिनेमा योग्य आहे की नाही याचा निर्णय प्रेक्षक घेतली. तसेच त्याने सांगितले की,  मला वाटतं नाही की सिनेमात काही आक्षेपार्य आहे. त्यामुळे हा सिनेमा रिलीज होणार आणि उत्तम चालणार.

एएनआयच्या रिपोर्टनुसार सीबीएफसीने या सिनेमाच्या निर्मात्यांना स्पष्ट सांगितले की, नियमांनुसार या सिनेमाची समिक्षा केली जाईल. या अगोदर सिनेमा जेव्हा सेंसर बोर्डाला पाठवण्यात आला तेव्हा काही तांत्रिक कारणामुळे पुन्हा पाठवण्यात आला. 
तसेच निर्मात्यांनी रविवारी सांगितले की, संजय लीला भन्साळी यांनी सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. हा सिनेमा १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र आता या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारिख ठरलेली नाही. 

वायकॉम १८ मोशन पिक्चर्सच्या एका प्रवक्ताने सांगितले की, त्यांनी सिनेमा पुढे ढकलण्याचा निर्णय स्वतःहून घेतला आहे. तसेच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमाला प्रदर्शनासाठी परवानगी दिली जात नाही. तसेच पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सांगितले की, इतिहासासोबत कोणतीही थट्टा खपवून घेणार नाही. त्याचा विरोधच केला जाईल.