Imran Khan ने केला करण जोहरचा अपमान? रणबीर कपूरलाही बसला धक्का, नेमकं काय आहे प्रकरण?

Imran Khan Birthday:  बालकलाकार म्हणून इमरान खानला प्रेक्षकांनी पसंत केले होते. काही काळानंतर त्याने चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून करिअर सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण... 

Updated: Jan 13, 2023, 12:56 PM IST
Imran Khan ने केला करण जोहरचा अपमान? रणबीर कपूरलाही बसला धक्का, नेमकं काय आहे प्रकरण? title=

Imran Khan Birthday: 2008  मध्ये जाने तू जाने ना (Jaane Tu... Ya Jaane Na) या चित्रपटातून अवघ्या तरुणींच्या गळ्यातील ताईत बनलेला अभिनेत म्हणजे इमरान खान (Imran Khan ). 'जाने तू या जाने ना' (Jaane Tu... Ya Jaane Na) या चित्रपटात इमरान खान जिनिलीया डिसुजा (Genelia D'souza) हिच्यासोबत झळकला होता. या चित्रपटाने इमरानसाठी बॉलिवूडचा दरवाजा खुला केला होता. मात्र, याच दरवाज्यातून त्याची कारकीर्द कधी बाहेर निघून गेली हे कुणाच्याच लक्षात आले नाही. मनोरंजन विश्वापासून दूर असलेला इमरान खान आज त्याचा 40 वा वाढदिवस (Happy Birthday Imran Khan ) साजरा करत आहे. 

दरम्यान 2010 मध्ये त्याच्या चित्रपटाच्या कारकिर्दीत असताना, इम्राम खान हा 'कॉफी विथ करण सीझन 3' (Koffee With Karan Season 3) या शो मध्ये दिसला होता. इम्रान सोबत रणबीर कपूरही (Ranbir Kapoor) होता. त्यानंतर या शोमध्ये इम्रान आणि रणबीरच्या यांच्यासोबत 'रॅपिड फायर राऊंड' मध्ये करण जोहरच्या (Karan Johar) एका प्रश्नाला इम्रानने जसा तसे उत्तर दिले. खरं तर इम्रानने दिलेल्या उत्तरानंतर होस्ट करण जोहरची खिल्ली उडवल्यासारखे होते. 

करणने  इम्रानला विचारला 'हा' प्रश्न

'कॉफी विथ करण सीझन 3' (Koffee With Karan Season 3)  या शोमध्ये होस्ट करण जोहर याने इम्रान खानला, तू ही पुस्तके कोणाला देणार? त्यावर इम्रानने या प्रश्नाला उत्तर देताना करण म्हणाला की, मी तुम्हाला देऊ शकतो का?, असं म्हणताचं इमरानच्या उत्तरामुळे करण जोहर हैराण झाल्याचे दिसून आले. त्याचवेळी रणबीरने इम्रान खानला हाय-फाइव्ह दिले आणि 'मला अजूनही तुमच्यासोबत काम करायला आवडेल' असं  चित्रपट निर्मात्याला म्हणाला.    

वाचा: Adil Khan च्या नकारावर वकीलांचा धक्कादायक खुलासा 

इमरान खानचा जन्म 13 जानेवारी 1983 रोजी अमेरिकेत झाला. तो एका फिल्मी कुटुंबातून असल्यामुळे सुरुवातीपासून त्याला अभिनयाची आवड होती. इमरान खानचे आजोबा नासिर हुसेन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते होते. तर, मामा आमिर खान हा बॉलिवूडमधला बहुचर्चित अभिनेता. बालकलाकार म्हणून त्याने आमिर खानच्या 'कयामत से कयामत तक' आणि 'जो जीता वही सिकंदर' या चित्रपटांमधून छोट्या भूमिका साकारल्या होत्या. 

इम्रान खानची कारकीर्द

इम्रान खान शेवटचा चित्रपट निखिल अडवाणीच्या कट्टी बट्टी (2015) मध्ये कंगना राणौतसोबत दिसला होता. 'जाने तू या जाने ना' या त्यांच्या पहिल्या चित्रपटाने त्यांना काही पुरस्कारही मिळाले. इमरान 'दिल्ली बेली', 'आय हेट लव स्टोरीज', 'मेरे ब्रदर की दुल्हन', 'एक मैं और एक तू' आणि 'ब्रेक के बाद' यांसारख्या चित्रपटांत देखील त्याने काम केले.