अर्जुनच्या आयुष्यात मलायका नव्हे, तर या महिलेला पहिलं स्थान, स्वत:च दिली कबुली

दोघांचे इंस्टाग्राम अकाउंट एकमेकांसोबत मस्ती करतानाच्या फोटोंनी भरलेले आहे.

Updated: Jan 20, 2022, 07:20 PM IST
 अर्जुनच्या आयुष्यात मलायका नव्हे, तर या महिलेला पहिलं स्थान, स्वत:च दिली कबुली title=

मुंबई : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांची जोडी बी-टाऊनमधील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी आहे. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केले जाते. दोघांना एकत्र पाहून असे वाटते की त्यांच्या आयुष्यात एकमेकांची साथ त्यांच्यासाठी खूप खास असेल.मात्र, अर्जुन कपूरने शेअर केलेला फोटो काही औरच सांगतो आहे.

अभिनेता अर्जुन कपूरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये त्याची धाकटी बहीण अंशुला कपूर तिच्या पाळीव कुत्र्याला मिठी मारताना दिसत आहे.

हा फोटो खूपच सुंदर आहे यात शंका नाही. विशेष म्हणजे अर्जुन कपूरनेही तो शेअर केला आणि 'माझ्यासाठी सर्वात मौल्यवान' असे कॅप्शनमध्ये लिहिले.

मलायका अरोरा अर्जुनच्या आयुष्यात नंबर वन असेल असे आतापर्यंत चाहत्यांना वाटत असताना, अभिनेत्याच्या या कॅप्शनने स्पष्ट केले की त्याची बहीण अंशुला त्याच्यासाठी खूप मौल्यवान आहे. अर्जुन त्याची बहीण अंशुला कपूरच्या खूप जवळ आहे आणि तिची खूप काळजी घेतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दोघांचे इंस्टाग्राम अकाउंट एकमेकांसोबत मस्ती करतानाच्या फोटोंनी भरलेले आहे. अर्जुन कपूर अनेकदा त्याची बहीण अंशुलासोबतचे फोटो शेअर करून आपले प्रेम व्यक्त करतो.

Arjun Kapoor wishes sister Anshula Kapoor with a quirky post on Bhai Dooj |  People News | Zee News

त्याचवेळी, 2018 मध्ये श्रीदेवीच्या निधनानंतर अर्जुन कपूरने त्याच्या तीन बहिणी अंशुला, जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांचीही काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. अनेकदा अनेक प्रसंगी सगळे एकत्र दिसतात.