BIGG BOSS MARATHI : जय-गायत्रीला दादूसने भेट दिली एवढ्या तोळ्यांची सोन्याची चैन

स्मॉल स्क्रिनवरील बिग बॉस मराठी हा शो सध्या कमालीचा चर्चेत आहे. 

Updated: Oct 2, 2021, 10:16 AM IST
BIGG BOSS MARATHI : जय-गायत्रीला दादूसने भेट दिली एवढ्या तोळ्यांची सोन्याची चैन title=

मुंबई : स्मॉल स्क्रिनवरील बिग बॉस मराठी हा शो सध्या कमालीचा चर्चेत आहे. एका आठवड्यात या स्पर्धकांनी प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करायला सुरुवात केली आहे. त्यात अनेक टास्क पार पडत असताना घरात मोठ-मोठे वाद होताना ही दिसत आहेत. 

बिग बॉसने दिलेले टास्क पुर्ण करण्यासाठी स्पर्धक चांगलीच मेहनत घेत आहेत. नुकताच या आठवड्याच्या कॅप्टन पदासाठी टास्क झाला. ज्यात टीम A आणि टीम B  असे दोन ग्रुप करण्यात आले होते. या खेळात जय दुधाणे आणि गायत्री दातार यांनी सहभाग घेत बाजी मारली. चांगली कामगिरी करत या जोडीने विजेतेपद पटकावलं. 

त्यामुळे त्यांना कॅप्टन पदासाठी आता पुढची वाटचाल करता येणार आहे. पण हा टास्क संपताच एक विशेष गोष्ट बिग बॉसच्या घरात घडली. गायक दादूस यांनी विजेत्या जोडीला थेट आपल्या गळ्यातील सोन्याची चैन भेट म्हणून दिली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

तृप्ती देसाई यांनी दादूससोबत ही चैन गायत्रीला देखील दिली. दोघांना भलमोठी अशी सोन्याची चैन दिल्याने अनेकांना आर्श्चय देखील वाटले. पण दादूसने विजेत्यांचे अशाप्रकारे कौतुक केल्यांने त्यांची देखील विशेष चर्चा पाहायला मिळत आहे.