'बेडरूम कमी पडला का?' सार्वजनिक ठिकाणी सैफ-करिनाने केलंलं कृत्य पाहून युजर्स भडकले

रविवार करिना आणि सैफला त्यांच्या बिल्डिंगच्या बाहेर स्पॉट केलं गेलं. मात्र यावेळी या कपलने असं काह केलं ज्याचा व्हिडीओ सोशल  मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

Updated: May 13, 2024, 02:50 PM IST
'बेडरूम कमी पडला का?' सार्वजनिक ठिकाणी सैफ-करिनाने केलंलं कृत्य पाहून युजर्स भडकले title=

मुंबई : सैफ अली खान आणि करिना कपूरने  २०१२ साली कोर्ट मॅरीज केलं.  एकमेकांना बरीच वर्ष डेट केल्यानंतर करिनाने लग्नगाठ बांधली. सैफ अली खान आणि करिना कपूर खानला बॉलिवूडचं पॉवर कपल म्हटलं जातं. चाहते या कपलला प्रेमाने 'सैफीना' देखील म्हणतात. दोघंही कायमच एमकेकांचं कौतूक करत असतात. या दोघांचा हाच अदांज त्यांच्या चाहत्यांना सर्वात जास्त आवडतो. अनेकदा या कपलचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.

रविवार करिना आणि सैफला त्यांच्या बिल्डिंगच्या बाहेर स्पॉट केलं गेलं. मात्र यावेळी या कपलने असं काह केलं ज्याचा व्हिडीओ सोशल  मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नुकताच समोर आलेला व्हिडीओत दोघंही एकमेंकाच्या प्रेमात बुडाल्याचं पहायला मिळालं. 

मीडियाला पाहून करिना आणि सैफने केलं किसं?
सैफ अली खान आणि करिना कपूर खान या दिवसात आप-आपल्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत. मात्र नुकताच या जोडीचा रविवारी या कपलचा व्हिडीओ ,समोर आला आहे. ज्यामध्ये दोघंही आपल्या बिल्डींगपासून ते आपल्या कारपर्यंत एकत्र जाताना दिसत आहेत. यादरम्यान या जोडीने सगळ्यांच लक्ष तेव्हा केंद्रित केलं जेव्हा या जोडीने लिपलॉक केलं. दोघांचा हा व्हिडीओ समोर येताच सगळीकडे धुमाकूळ झाला आहे. 

सोशल मीडियावर सैफीना ट्रोल
एका बाजूला युजर्स या कपलला क्यूट बोलताना दिसत आहेत तर एकीकडे मात्र या जोडीला अनेकजण ट्रोलही करताना दिसत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलंय की, असं दिसतंय की, प्रेम दाखवण्यासाठी बेडरूम कमी पडला वाटतं. तर अजून एका युजर्सने लिहीलंय, हे सगळं एका रुममध्येपण होवू शकलं असतं घडले असतं. तुम्ही संस्कृती बिघडवत आहात. तर अजून एका यूजरने लिहिलं की, घरी किस करायला वेळ नाही वाटतं तुमच्याकडे. अशा अनेक प्रकारच्या कमेंट युजर्स या पोस्टवर करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सैफ करिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, करिना शेवटची 'क्रू' सिनेमात दिसली होती. लवकरच करिना  'सिंघम अगेन' या मल्टीस्टारर चित्रपटात दिसणार आहे. तर सैफ अली खान शेवटचा आदिपुरुष सिनेमात दिसला होता. लवकरच सैफचा आगामी  'देवरा: पार्ट वन' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आदिपुरुष सिनेमात सैफ रावणाच्या भूमिकेत दिसला होता. त्याची ही भूमिका मोठ्या पडद्यावर खूप गाजली होती.