दुप्पट वयाच्या अभिनेत्रीसोबत ईशान खट्टरचा रोमान्स; किसिंग सीनमुळे चर्चेत

दुप्पट वयाच्या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत ईशान खट्टरचं अफेअर? चर्चांना उधाण

Updated: Nov 1, 2021, 08:51 AM IST
दुप्पट वयाच्या अभिनेत्रीसोबत ईशान खट्टरचा रोमान्स; किसिंग सीनमुळे चर्चेत  title=

मुंबई : अभिनेता ईशान खट्टर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. अलीकडेच ईशान अभिनेत्री अनन्या पांडेची काळजी घेताना आणि वाईट दिवसात तिला साथ देताना दिसला. ईशान खट्टरसाठी आजचा दिवस खास आहे, आज ईशानचा वाढदिवस आहे. ईशान खट्टरची बॉलीवूडमधील इनिंग अद्याप हवी तशी नाही. पण त्याने आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केल. ईशानने बालकलाकार म्हणून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. 'वाह लाइफ हो तो ऐसी' चित्रपटाच्या माध्यमातून त्याने अभिनयास सुरूवात केली. 

ईशान खट्टरचे जन्मस्थान
इशान खट्टरचा वाढदिवस 1 नोव्हेंबर 1995 रोजी मुंबईत झाला. ईशान खट्टर हा बॉलिवूड अभिनेत्री नीलिमा आझमी आणि राजेश खट्टर यांचा मुलगा आहे. ईशान शाहिद कपूरचा सावत्र भाऊ आहे. सावत्र भाऊ असले तरी ईशान आणि ईशानमधील नातं फार घट्ट आहे. ईशान खट्टरने त्याचं संपूर्ण शिक्षण मुंबईतून पूर्ण केलं आहे. 

ईशान खट्टरचा पहिला चित्रपट
'वाह लाइफ हो तो ऐसी' नंतर 2016 मध्ये रिलीज झालेल्या 'उडता पंजाब' चित्रपटात ईशान खट्टर कॅमिओ करताना दिसला होता. 2017 मध्ये त्यांनी 'हाफ विडो' चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका साकारली होती. यानंतर 2017 मध्ये तो 'बियॉन्ड द क्लाउड्स' चित्रपटात काम करताना दिसला.

 पण हे सर्व चित्रपट त्याला हवी तशी ओळख देऊ शकले नाहीत. ईशान खट्टरला 2018 मध्ये आलेल्या 'धडक' चित्रपटातून यश मिळाले, ज्यामध्ये तो श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरसोबत दिसला होता. या चित्रपटासाठी ईशानला अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले.

'ए सूटेबल बॉय'वरून वाद
'धडक'नंतर ईशान नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या 'ए सुटेबल बॉय' या मालिकेत दिसला. या चित्रपटातील एका दृश्यावरून बराच गदारोळ झाला होता. यामध्ये दाखवण्यात आलेले किसिंग सीन हे मंदिरात चित्रित केल्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या वेब सिरीजमध्ये अभिनेत्री तब्बू आणि अभिनेता ईशान खट्टर मुख्य भूमिकेत दिसले.

ईशान खट्टर ही सीरिज प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत होता. इशानने सीरिजमध्ये तब्बूसोबत प्रेमप्रकरणाची भूमिका साकारली होती. रिपोर्टनुसार,  सीरिजमध्ये  ईशान आणि तब्बूचा किसिंग सीन देखील होता, ज्यामुळे बराच गदारोळ झाला होता.