'तू लोकांना घाबरवते...' Jacqueline Fernandez चे फोटो पाहून चाहत्यांची प्रतिक्रिया

Jacqueline Fernandez असा फोटो तुम्हीही कधी पाहिला नसेल... अनेकांनी फोटो पाहिला पण....  

Updated: Jun 15, 2022, 07:59 AM IST
'तू लोकांना घाबरवते...' Jacqueline Fernandez चे फोटो पाहून चाहत्यांची प्रतिक्रिया  title=

मुंबई : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. जॅकलिन फक्त सिनेमांमध्येचं नाही, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील चाहत्यांचं मनोरंजन करत असते. आता देखील जॅकलिन इन्स्टाग्रामवरील काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. फोटोमध्ये जॅकलिनचा विचित्र लूक चाहत्यांसमोर आला आहे. अभिनेत्रीचे काहींना आवडले आहेत, तर काहींनी मात्र टीका केली आहे. आता शेअर केलेल्या फोटोंमुळे जॅकलिनला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. 

जॅकलिनने एक सेल्फी शेअर केला आहे. फोटोमध्ये जॅकलिन एक विचित्र पोज देताना दिसत आहे. जॅकलिन दिलेली पोज ठिक आहे, पण तिच्या फाटलेल्या ब्रावर अनेकांची नजर पडली. याच कारणामुळे जॅकलिनला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिनेत्रीच्या फोटोंवर अनेकांच्या कमेंट आणि लाईक्स येत आहे. सध्या जॅकलिनचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल आहे. काही दिवसांपूर्वी जॅकलिन सुकेश चंद्रशेखरमुळे वादाच्या भोवऱ्यात होती. पण आता जॅकलिन फोटोमुळे चर्चेत आहे.

जॅकलिनचे आगामी सिनेमे.... 
जॅकलिन फर्नांडिसचे सध्या अनेक चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. जॅकलिन लवकरच अक्षय कुमार आणि नुसरत भरुचासोबत 'राम सेतू' सिनेमात दिसणार आहे.

यंदाच्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर सिनेमा प्रदर्शित होणार आहे. याशिवाय रोहित शेट्टीच्या आगामी 'सर्कस' या सिनेमात जॅकलीन रणवीर सिंगसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सिनेमातच पूजा हेगडेही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. यंदाच्या ख्रिसमसला सिनेमा प्रदर्शित होणार आहे.