एक दो तीन... गाण्यावर भडकले तेजाबचे दिग्दर्शक ; सलमानने घेतली बाजू

अलिकडेच प्रदर्शित झालेले बागी २ सिनेमाचे एक दो तीन.. हे गाण्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. 

Updated: Mar 22, 2018, 11:31 AM IST
एक दो तीन... गाण्यावर भडकले तेजाबचे दिग्दर्शक ; सलमानने घेतली बाजू title=

मुंबई : अलिकडेच प्रदर्शित झालेले बागी २ सिनेमाचे एक दो तीन.. हे गाण्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. ९० च्या दशकात तेजाब सिनेमातील या गाण्यावर माधुरी दीक्षित थिरकली होती. त्यावेळेस त्या गाण्याने लोकप्रियतेच्या सर्व सीमा पार केल्या होत्या. मात्र आता या गाण्यावर जॅकलिन फर्नांडिज थिरकणार आहे. तिच्या या गाण्यावर तेजाबचे दिग्दर्शक एन चंद्रा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर बागी २ च्या निर्मात्यांवर कारवाई करण्याचा विचार ते करत आहेत. 

सलमान खानने घेतली तिची बाजू 

माधुरी दीक्षितचे नृत्यदिग्दर्शन सरोज खान यांनी केले आहे. माधुरीच्या बहारदार नृत्याने सजलेल्या या गाण्याची बागी २ मध्ये वाट लागली आहे, असे दिग्दर्शक एन. चंद्रा यांचे म्हणणे आहे. मात्र जॅकलिनच्या या गाण्यावरून उठलेल्या वादावर तिचा को-स्टार सलमान खानने तिची बाजू घेतली आहे. सलमानने बुधवारी जॅकलिनचे हे गाणे शेअर करत तिचे कौतुक केले.

FIRST Look: 'बागी 2' में कुछ इस अंदाज में 'एक दो तीन..' करती दिखेंगी जैकलीन फर्नांडीज

काय म्हणाला सलमान?

सलमानने ट्वीटमध्ये लिहिले की, हे गाणे मला खूप आवडले. जॅकीने दिग्गज सरोज खान यांच्या स्टेप्सला पूर्ण न्याय दिला आहे. मात्र माधुरीला मॅच करणे कठीण आहे. फॅन्सना हे गाणे आवडतेय. ते खूप एन्जॉय करत आहेत. मला अभिमान आहे. 

जॅकलिन, सलमान खानच्या आगामी सिनेमा रेस ३ मध्ये त्याची नायिका साकारत आहे. यापूर्वी किक सिनेमातही त्यांनी एकत्र काम केले आहे.