जेम्स बॉन्डची कार लिलावात, बोली ऐकूण व्हाल थक्क

 प्राप्त माहितीनुसा या कारसाठी लावली जाणारी बोली १०.०५ कोटी रूपयांपासून पुढे लावली जाणार आहे. 

Updated: May 29, 2018, 12:06 PM IST
जेम्स बॉन्डची कार लिलावात, बोली ऐकूण व्हाल थक्क title=

नवी दिल्ली: जेम्स बॉन्डचा लोकप्रिय चित्रपट गोल्डन आयमध्ये वापरण्यात आलेली Aston Martin DB5 ही कार विक्रीसाठी लिलावात ठेवण्यात येणार आहे. ब्रिटीश कंपनी Bonhams मार्फत गुडवूड ऑफ स्पीड नावाच्या एका फेस्टीव्हलमध्ये १३ जुलै २०१८मध्ये ही कार विक्रीसाठी ठेवली जाईल. प्राप्त माहितीनुसा या कारसाठी लावली जाणारी बोली १०.०५ कोटी रूपयांपासून पुढे लावली जाणार आहे. कारची लोकप्रियता पाहता ही बोली १३.५४ कोटी रूपयांवर पोहचण्याची शक्यता आहे.

चाहत्यांना कार भलतीच परिचीत

गोल्डन आय चित्रपट १९९५मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून ही कार प्रसारमाध्यमे आणि बॉन्डच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय होती. जेम्स बॉन्डच्या चाहत्यांना ही कार चांगलीच परिचित असणार कारण, ही कार जेम्स बॉन्डच्या ७ चित्रपटांत झळकली आहे.

खरेदीदाराबाबत उत्सुकता

एस्टन मार्टिन DB5चे प्रॉडॉक्शन १९६३ ते १९६५दरम्यान झाले होते. तेव्हा, या कार्सची एकूण संख्या विचारात घेता १०५९ कारच बनविण्यात आल्या होत्या. कारच्या पॉवरबाबत बोलायचे तर, DB5 मध्ये ४.०चे स्ट्रोक इंजिन बसविण्यात आले आहे. जे 282bhp पॉवर आणि 380Nmचे टॉर्क निर्माण करते. ही कार ० ते १०० किलोमिटर प्रती तास साधारण ७.१ सेकंद अशा वेगाने धावते. या कारचे टॉप स्पीड 228 km/h असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या कारच्या खरेदीदाराबाबत उत्सुकता आहे.