Tom Hanks नंतर 'या' कलाकाराला कोरोनाची लागण

एक लाखांहून अधिकजण कोरोनाच्या विळख्यात

Updated: Mar 17, 2020, 07:47 AM IST
Tom Hanks नंतर 'या' कलाकाराला कोरोनाची लागण  title=

मुंबई : 'क्वांटम ऑफ सोलेस'ची अभिनेत्री ओल्गा कुरिलेंको (Olga Kurylenko) ला देखील कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार ४० वर्षीय अभिनेत्रीने २००८ मध्ये सिनेमात कॅमिले मोंटेसचं भूमिका साकारली आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार एक आठवडा आजारी राहिल्यानंतर तिने आपली तपासणी करून घेतली. त्यामध्ये तिला कोरोनाची लागण झाल्याच कळलं. 

सध्या ती आयसोलेशन विभागात आहे. तिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने एका बंद खिडकीच्या समोर उभं असलेला फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिने लिहिलं आहे. 'ताप आणि थकवा ही कोरोनाची प्रमुख लक्षण आहात. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या आणि त्याकडे गंभीरतेने पाहा.' 

अभिनेत्री पुढे म्हणाली आहे की,'ताप कमी करण्यासाठी त्यांना पॅरासिटामोल ही गोळी घेण्यास सांगितलं. जे मी घेत आहे. त्यापेक्षा जास्त काही करण्याची गरज नाही. मी पहिल्याप्रमाणेच व्हिटामीनच्या गोळ्या घेत आहे. आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लसूण खात असल्याचं देखील म्हणाली.'

एक लाखांहून अधिकजणांना लागण झालेल्या या व्हायरसच्या विळख्यात आलेला हा अभिनेता म्हणजे टॉम हँक्स आणि त्याची पत्नी रिटा विल्सन. कोरोनाची लागण झाल्याचं कळताच टॉमने सोशल मीजियाच्या माध्यमातून याविषयीची माहिती दिली. ज्यानंतर त्याच्या आणि त्याच्याच्या पत्नीविषयी चाहत्यांच्या वर्तुळातून चिंता व्यक्त करण्यात आली. काहींनी त्यांच्या स्वास्थ्यासाठी सदिच्छाही व्यक्त केल्या. चाहत्यांचं हेच प्रेम आणि योग्य वैद्यकिय उपचार, प्रतिबंधात्मक यांच्या बळावर हँक आणि त्याच्या पत्नीने कोरोनाचा लढा दिला. ज्यानंतर आता त्याने एक सकारात्मक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामाध्यमातून त्याने सर्वांनाच एक मोलाचा सल्लाही दिला आहे.