एकही Blockbuster चित्रपट नाही तरी 'ही' अभिनेत्री 25000 कोटींची मालकीण; SRK, Big B ही तिच्यासमोर फिके

Jami Gertz Net Worth: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे एका लोकप्रिय अभिनेत्रीची. तिनं अक्षरक्ष: बॉलिवूडच्या कलाकारांनीही मागे टाकलं आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. या अभिनेत्रीचे नेटवर्थ ऐकून तुम्हालाही घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 15, 2023, 02:49 PM IST
एकही Blockbuster चित्रपट नाही तरी 'ही' अभिनेत्री 25000 कोटींची मालकीण; SRK, Big B ही तिच्यासमोर फिके title=
August 15, 2023 | jami gertz is the most richest actress more than amitabh bachchan and shahrukh khan

Jami Gertz Net Worth:  कलाकारांच्या अभिनयाची आणि त्यांच्या स्टाईलची जेवढी चर्चा होते तेवढीच चर्चा ही त्यांच्या कमाईची, मानधनाची अथवा नेटवर्थचीही होताना दिसते. कुणी कुठल्या चित्रपटासाठी किती मानधन घेतले आहे. याबद्दल अनेकदा चर्चा रंगलेली असते. सगळ्यात अधिक मानधन घेणारे सुपरस्टार म्हणजे कोण? तर नावं येतात सलमान खान, शाहरूख खान, आमिर खान, दीपिका पादूकोण, करीना कपूर वैगेरे. त्यातून आता बॉलिवूडचे सेलिब्रेटी हे फक्त बॉलिवूडपर्यंत मर्यादित नाहीत. तर ते जगातील मोठमोठ्या कलाकारांनाही टक्कर देऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. त्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत कलाकार कोण असा प्रश्नही त्यानिमित्तानं उपस्थित होतो आहे. हॉलिवूडचे असे अनेक सेलिब्रेटी आहेत जे अत्यंत लोकप्रिय आहेत आणि त्यांचा चाहतावर्गही प्रचंड मोठा आहे. त्यातून येथेही कलाकारांमध्ये मोठी स्पर्धा रंगलेली पाहायला मिळते. 

सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका अभिनेत्रीची. या अभिनेत्रीनं शाहरूख खान, सलमान खान, नागार्जुन, प्रभास, अल्लू अर्जुन या सर्वच अभिनेत्यांना मानधनाच्या बाबतीत मागे सोडलं आहे आणि तिनं जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री होण्याचा मान पटकवला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची जोरात चर्चा रंगलेली आहे. जामी गर्ट्ज असं या अभिनेत्रीचे नावं आहे. 

तुम्ही म्हणाल की नक्की ही कोणती अभिनेत्री आहे कारण हिचं नावं तर आम्ही कधीच ऐकलं नाही. मग ही अभिनेत्री सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्री कशी ठरली आहे. हॉलिवूडचं नावं घेतलं तर पहिलं डोळ्यासमोर येतं ते म्हणजे ज्युलिया रॉबर्ट्स, एना हाथवे, एन्जलिया जोली, जेनिफर एनिस्टन, सॅड्रा बुलॉक यांचे. यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांमधून कामं केली असून त्यांची लोकप्रियताही अफाट आहे. त्यातून त्यांनी त्यांच्या या लोकप्रिय चित्रपटांसाठी तगडे मानधन घेतलेले आहे. परंतु कोणत्याही हिट चित्रपटांमध्ये काम न करता या अभिनेत्रीनं चांगलीच कमाई केली आहे चित्रपटमाध्यमातून. तिनं अनेक ठिकाणी गुंतवणूक केल्याचे बोलले जाते आहे. जामीचा पती हा एक लोकप्रिय उद्योगपती आहे. टोनी रेस्लर आणि जामी हे दोघंही जण टीम अटलांटा हॉक्स या कंपनीचे मालक असून त्यांचे इतरही अनेक व्यवसाय आहेत. 

डीएनएच्या एका रिपोर्टनुसार, जामी गर्ट्झ हिची नेटवर्थ 3 बिलियन युएसडी इतकी आहे. म्हणजेच 25,000 कोटी. जामीचे वय 57 एवढे आहे. तिनं 1970 साठी बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरूवात केली होती. 1981 साली आलेल्या Endless Love या चित्रपटातून तिनं अभिनयाची सुरूवात केली होती. तिनं अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांतून कामं केली आहेत. I Want You Back या चित्रपटातून तिनं काम केले होते. नुकताच हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. 

शाहरूख खान, सलमान खान पडले मागे? 

शाहरूख खान यांच्याकडे 6300 कोटी इतकी संपत्ती आहे तर अमिताभ बच्चन यांच्याकडे 3000 कोटी. सलमान खान यांच्याकडे 2800 कोटी इतकी संपत्ती आहे. त्यामुळे जामीनं या सर्वांनाच मागे टाकलं आहे.