जानव्ही कपूर ही प्रतिभा संपन्न अभिनेत्री - पंकज त्रिपाठी

'धडक' या चित्रपटातून रूपेरी पडद्यावर झळकणारी जानव्ही कपूर बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चेत असते. मात्र यावेळी जानव्ही कपूर वेगळ्याचं कारणामुळे चर्चेत आली आहे.

Updated: May 27, 2019, 08:08 PM IST
जानव्ही कपूर ही प्रतिभा संपन्न अभिनेत्री - पंकज त्रिपाठी  title=

मुंबई : 'धडक' या चित्रपटातून रूपेरी पडद्यावर झळकणारी जानव्ही कपूर बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चेत असते. मात्र यावेळी जानव्ही कपूर वेगळ्याचं कारणामुळे चर्चेत आली आहे. आगामी ‘कारगिल’ सिनेमाच्या पार्श्वभुमीवर अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी जान्हवीचे कौतूक केले आहे. या सिनेमात दोघांनी एकत्र काम केले असून त्याची शूटींग सध्या सुरु आहे. 

कारगिल चित्रपटातून जानव्ही कपूर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. कारगिलमध्ये जान्हवी कपूर ही पंकज त्रिपाठी सोबत काम करत आहे. ‘कारगिल’ हा तिचा दुसरा हा चित्रपट आहे, हा चित्रपट आयएएफ अधिकारी गुंजन सक्सेना यांच्या जिवनावर आधारित आहे. जानव्ही ही आयएएफ अधिकारी गुंजन सक्सेना यांच्या भूमिकेत पडद्यावर झळकणार आहे. तर पंकज त्रिपाठी हे अधिकारी गुंजन सक्सेना यांच्या वडिलंच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसतील. पंकज त्रिपाठी हे पहिल्यांदाच जानव्ही कपूर बरोबर एकत्र काम करणार आहे. अलीकडेच चित्रपटाची शूटिंग लखनऊमध्ये झाली.

जानव्हीसोबत काम करतांनाचा अनुभव पंकज त्रिपाठी यांनी शेअर केला आहे. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितले. जानव्ही कपूर खुप मेहनती आहे. जानव्ही सेटवर सर्वांचा आदर करते आणि जानव्ही नेहमीच उत्साही असते असे पंकज त्रिपाठी म्हणाले. सांगतात तिच्या सोबत काम करण्याचा अनुभव खुप चांगला आहे. यासोबत सिनेमाच्या शुटींगमधील अनेक किस्से त्यांनी शेअर केले.