जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडने घराबाहेर पडताना तोंड का लपवलं?

ज्या फोटोंमध्ये अक्षत जान्हवीच्या घरातून बाहेर पडताना दिसत होता.

Updated: Mar 6, 2022, 08:09 PM IST
 जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडने घराबाहेर पडताना तोंड का लपवलं? title=

मुंबई : बोनी कपूर यांची लाडकी मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आता तिचा 25 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने अभिनेत्रीवरही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे, तसेच जान्हवीशी संबंधित अनेक किस्सेही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान, जान्हवीचे एक विधान पुन्हा चर्चेत आले आहे जेव्हा तिने तिचा कथित बॉयफ्रेंड अक्षत रंजनबद्दल सांगितले की त्याला माझ्यासोबत हँग आऊट करायला भीती वाटते.

एकदा जान्हवीला अक्षतबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, तेव्हा ती म्हणाली, 'अफवा पसरवणाऱ्यांनी असेही म्हटले आहे की मी माझा बालपणीचा जिवलग मित्र अक्षतला डेट करत आहे, जो आता माझ्यासोबत हँग आउट करायला खूप घाबरतो. लोक आम्हाला एकत्र बघतील याची त्याला खूप भीती वाटते.

ज्या फोटोंमध्ये अक्षत जान्हवीच्या घरातून बाहेर पडताना दिसत होता. त्या फोटोंबद्दलही अभिनेत्रीने मोकळेपणाने सांगितले. तो बाबांच्या वाढदिवसानिमित्त घरी आला होता.

When Janhvi Kapoor said her rumoured boyfriend Akshat Ranjan is 'scared to  hangout' with her

त्यावेळी फोटोग्राफर अर्जुन भैय्याच्या घराबाहेर उभे होते आणि त्यांना पाहून तो एका कोपऱ्यात जाऊन लपला, आणि हुडीने तोंड झाकून निघून गेला.

जान्हवी आणि अक्षत अनेकदा एकत्र दिसले आहेत, त्यांच्या अफेअरच्याही चर्चा आहेत, पण अभिनेत्री तो तिचा बेस्ट फ्रेंड असल्याचे सांगते.