जान्हवी कपूरचा हा व्हीडिओ पाहून तुम्ही देखील थांबवू शकणार नाही हसू, व्हीडीओ होतोय व्हायरल

अभिनेत्री जान्हवी कपूरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये जाह्नवी वर्कआउट करताना गाणं गाऊन स्वत:ला मोटीवेट करत आहे

Updated: Apr 12, 2021, 09:57 PM IST
जान्हवी कपूरचा हा व्हीडिओ पाहून तुम्ही देखील थांबवू शकणार नाही हसू, व्हीडीओ होतोय व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही इंडस्ट्रीमधील सर्वात फिट अभिनेत्री आहे. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जान्हवी जिममध्ये खूप घाम गाळते. अलीकडे, मालदीवच्या सुट्टीच्या वेळी देखील तिने आपलं वर्कआऊट स्किप केला नाही. आता जान्हवीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये जाह्नवी वर्कआउट करताना गाणं गाऊन स्वत:ला मोटीवेट करत आहे

जान्हवी कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती खूप मेहनतीने वर्कआउट करताना कतरिना कैफचं 'शीला की जवानी' गाणं गात आहे. व्हिडिओमध्ये जान्हवी व्हाइट कलरच्या जिम कपड्यांमध्ये दिसली आहे.. जिथे ती अचानक 'शीला की जवानी' गायला लागते आणि हसू लागते. जाह्नवीची ही शैली पाहून तिचा प्रशिक्षकसुद्धा हसू रोखू शकला नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tony Wick (@tonywick_sharma)

जाह्नवीचे गाणं ऐकल्यावर ती हसण्यास सुरुवात करते. यादरम्यान जान्हवीचा पॉस्चर गडबडतो. ज्यावर हसून तिची ट्रेनर तिला पाठ सरळ ठेवण्यास सांगते. व्हिडिओमध्ये जाह्नवीची ही स्टाईल चांगलीच पसंत केली जात आहे. बरेच नेटकरी तिच्या शैलीवर केमेंन्ट करत कौतुक करत आहेत. नुकतीच जान्हवीच्या सुट्टीतील फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले होते. ज्यामध्ये जान्हवी बिकिनीमध्ये टोन्ड बॉडी फ्लॉन्ट करताना दिसली.

जान्हवी कपूरचा 'रूही' सिनेमा रिलीज झाला होता. हा एक हॉरर कॉमेडी ड्रामा सिनेमा आहे. या सिनेमात जान्हवी कपूरसोबत राजकुमार राव लीड रोलमध्ये दिसत आहे. थिएटरमध्ये रिलीज झालेल्या सिनेमाला कोविडचा मोठा फटका बसला. `रूही` जान्हवी कपूरच्या करिअरमधील तिसरा सिनेमा आहे. या अगोदर 'धडक' आणि 'गुंजन सक्सेना-द कारगिल गर्ल' मध्ये देखील जान्हवी कपूर दिसली. जान्हवीचा अभिनय पसंत केला जात आहे.