...म्हणून सलमानला पुन्हा चढावी लागणार कोर्टाची पायरी

जेव्हा जेव्हा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले 

Updated: Sep 15, 2020, 07:53 AM IST
...म्हणून सलमानला पुन्हा चढावी लागणार कोर्टाची पायरी title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : बहुचर्चित अशा काकानी हरीण शिकार प्रकरणी आता बॉलिवूड अभिनेता सलमान खान Salman Khan याला पुन्हा एकदा न्यायालयाची पायरी चढावी लगाणार आहे. सदर प्रकरणी त्याला कोर्टात उपस्थित राहावं लागणार आहे. जिल्हा आणि सेशन कोर्टात झालेल्या सुनावणीवेळी सलमानला पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता या प्रकरणीची २८ सप्टेंबरला पुढची सुनावणी होणार आहे.

सलमानला आतापर्यंत जेव्हा जेव्हा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले तेव्हा तेव्हा जवळपास बहुतांश वेळा तो न्यायालयात हजर झाला आबे. पण, मागील काही काळापासून मात्र त्यानं हे सत्र मोडित काढलं आहे. ज्याबाबत न्यायालाकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. 

'हम साथ साथ है' या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी सुरु झालेलं प्रकरण... 

'हम साथ साथ है' या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी जोधपूर येथील कांकणी गाव, घोडा कृषी फार्म आणि भवाद येथे हरिणाची शिकार केल्याचा आरोप सलमानवर लावण्यात आला होता. त्याच्याव्यतिरिक्त या प्रकरणी अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री नीलम, तब्बू, सोनाली बेंद्रे यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले होते. 

 

कलाकारांची आरोपांतून मुक्तता.... 

घोडा कृषी फार्म आणि भवाद शिकार प्रकरणी सलमान खानला हायकोर्टानं दिलासा दिला होता. पण, सरकारनं सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणीची एसएलपी दाख केली होती. तर, सैफ अली खान, नीलम, तब्बू, सोनाली बेंद्रे यांना सीजेएस ग्रामीण न्यायालयानं दिलासा दिला होता. ज्याविरोधात बिष्णोई समाज आणि स्थानिक शासनाकडून राजस्थान उच्च न्यायालयात आवाहन करण्यात आलं होतं.