संजय दत्त-सलमानने नाकारलेला चित्रपटामुळं फ्लॉप हिरोचे नशीब चमकले; व्हिलन बनून रचला इतिहास

John Abraham Flops: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि सलमान खान यांनी नाकारलेल्या चित्रपटामुळं या अभिनेत्याचं करिअर घडलं. पाहा कोण आहे तो अभिनेता 

मानसी क्षीरसागर | Updated: May 12, 2024, 01:55 PM IST
संजय दत्त-सलमानने नाकारलेला चित्रपटामुळं फ्लॉप हिरोचे नशीब चमकले; व्हिलन बनून रचला इतिहास  title=
john abraham 2004 dhoom rejected by salman khan sanjay dutt actor become star

John Abraham Flops: सलमान खान आणि संजय दत्त यांनी त्यांच्या फिल्मी कारकिर्दीत अनेक चित्रपटांना नकार दिला. मात्र, त्यांनी नाकारलेला एक चित्रपट सुपरहिट ठरला. त्याचबरोबर, या चित्रपटातील एका अभिनेत्याचं करिअरही रुळांवर आलं. जवळपास वीस वर्षांपूर्वी संजय दत्त आणि सलमान खानला एक चित्रपट ऑफर करण्यात आला होता. मात्र, दोघांनीही काही कारणांसाठी हा चित्रपटाला नकार दिला. मात्र या चित्रपटामुळं एका फ्लॉप ठरलेल्या हिरोचे मात्र नशीब फळफळले. 

2004 रोजी चित्रपटगृहात धूम हा चित्रपट आला होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमावला होता. अभिषेक बच्चन, ईशा देओल, लारा दत्ता, जॉन इब्राहिम, उदय चोप्रा या कलाकारांची प्रमुख भूमिका होती. धुम चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दिली होती. चित्रपटाची कथा, त्यातील गाणी आणि अॅक्शन यामुळं सिनेमा खूप चालला होता. मात्र, या एका सिनेमामुळं अभिनेत्याचे फ्लॉप होत चाललेले करिअर मार्गावर आले. हा अभिनेता आहे धूम चित्रपटात व्हिलनची भूमिका साकारणारा जॉन इब्राहिम. 

जॉनने या चित्रपटात  खलनायिका कबीरची भूमिका साकारली होती. इतकंच नव्हे तर, अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा हे देखील मुख्य भूमिकेत होते. तर , या चित्रपटात जॉनच्या भूमिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. जॉन इब्राहिम सुरुवातीला मॉडेल म्हणून काम करत होता. 2003मध्ये त्यांने जिस्म या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. महेश भट्ट यांनीच जॉनला हा चित्रपट दिला होता. जिस्ममध्ये बिपाशा बासूसोबतच जॉनची केमिस्ट्रीदेखील चांगली चर्चेत होते. जिस्म चित्रपट तेव्हा सुपरहिट ठरला होता. 

जिस्म चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर जॉन अब्राहमचे करिअर एकदम संथ झाले. त्याचे बॅक टू बॅक चार चित्रपट फ्लॉप ठरले. त्यात सत्या, ऐतबार, पाप आणि लकीर या चित्रपटांचादेखील समावेश होता. त्यानंतर जॉन अब्राहमला धूम हा चित्रपट मिळाला. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर धुडगुस घातला होता. मात्र, या चित्रपटासाठी जॉन निर्मात्यांची पहिली पसंत नव्हते. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांनी कबीरच्या भूमिकेसाठी पहिल्यांदा सलमान खानला विचारले होते. मात्र, काही कारणास्तव त्याने हा चित्रपट नाकारला होता. जर सलमानने हा चित्रपट केला असता तर धूममध्ये जॉनच्याऐवजी सलमान खान दिसला असता. त्यानंतर या चित्रपटासाठी संजय दत्तला विचारण्यात आले. मात्र, त्यांनेही हा चित्रपट नाकारला. तेव्हा शेवटी निर्मात्यांनी कबीरच्या भूमिकेसाठी जॉन अब्राहमला विचारले. त्यानेही लगेचच हा चित्रपट स्वीकारला. 

बॉक्स ऑफिस इंडियाच्यानुसार, धूम चित्रपटाचे बजेट फक्त 11 कोटी इतके होते. चित्रपट रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाने 31.60 कोटी आणि जगभरात 50.44 कोटींची कमाई करत इतिहास रचला होता. त्यानंतर धूम चित्रपटाचे अनेक भाग आले. धूम 2 मध्ये ऋतिक रोशन आणि धुम 3 मध्ये आमिर खानने खलनायकाची भूमिका साकारली होती.