जुही परमारने संपवले पती सचिन श्रॉफसोबतचे नाते...

टेलिव्हिजन विश्वात अत्यंत लोकप्रिय असलेली अभिनेत्री जुही परमार, पती सचिन श्रॉफपासून घटस्फोट घेत आहे. 

Updated: Jun 12, 2018, 11:07 AM IST
जुही परमारने संपवले पती सचिन श्रॉफसोबतचे नाते... title=

मुंबई : टेलिव्हिजन विश्वात अत्यंत लोकप्रिय असलेली अभिनेत्री जुही परमार, पती सचिन श्रॉफपासून घटस्फोट घेत आहे. जुहीला टी.व्ही. मालिका कुमकुममधून ओळख मिळाली होती. जुही आणि सचिन २००९ मध्ये विवाहबद्ध झाले. या दोघांच्या वैवाहीक आयुष्यात काहीतरी गडबड असल्याची चर्चा काही दिवसांपासून होती. काही महिन्यांपूर्वी सचिनपासून विभक्त राहत असल्याचेही जुहीने सांगितले होते आणि घटस्फोटाची प्रक्रीया चालू असल्याची माहितीही तिने दिली होती.

जुहीने केला खुलासा

सचिन आणि जुहीला एक मुलगी देखील आहे. ती सध्या जुहीसोबत राहत आहे. काही दिवसांपूर्वी जुही, राजीव खंडेलवालच्या टी.व्ही. शो मध्ये तिच्या आणि सचिनच्या नात्याबद्दल खुलेपणाने बोलली. याचदरम्यान तिने सांगितले की, २५ जूनला तिला सचिनपासून घटस्फोट मिळेल. दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय सहमतीने घेतला आहे. या निर्णय दोघांनीही मुलीचा विचार करुन घेतल्याचे तिने सांगितले. 

रॉयलवेडींगचा अंत असा का?

२००९ मध्ये जुही आणि सचिनने जयपूरमध्ये रॉयल वेडींग केले होते. विवाहासाठी त्यांनी एका खास दिवसाची निवड केली होती. इतकंच नाही तर दोघांनी १४ फेब्रुवारीला साखरपुडा केला होता. रिपोर्ट्सनुसार, सचिनचे म्हणणे आहे की, जुही शॉर्ट टेम्पर्ड आहे आणि साध्या साध्या गोष्टीवरुन तिला राग येतो. तर जुहीने एका मुलाखतीत सांगितले की, सचिनला विसरण्याचा आजार आहे.