EXCLUSIVE: लेक 'बाईपण भारी देवा'मधून करणार पदार्पण? सुकन्या मोने म्हणतात, ''मला माहितीच नव्हतं...''

Juila Mone Debut in Baipan Bhari Deva: 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्यामुळे या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा आहे. या चित्रपटातून सुकन्या मोने आणि संजय मोने यांची लेक डेब्यू करणार आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 27, 2023, 08:13 PM IST
EXCLUSIVE:  लेक 'बाईपण भारी देवा'मधून करणार पदार्पण? सुकन्या मोने म्हणतात, ''मला माहितीच नव्हतं...'' title=
June 27, 2023 | Juila Mone is going to debut in marathi upcoming film baipan bhari deva says sukanya mone

Juila Mone Debut in Baipan Bhari Deva: मंगळागौर... सहा बहिणींची कथा, इमोशन्स आणि धम्माल मज्जा मस्ती... यानं परिपुर्ण असा 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. 30 जून रोजी केदार शिंदे दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी आत्तापासूनच बुकींगला सुरूवात केली असेलच. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगणी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, दिपा चौधरी, सुचित्रा बांदेकर अशा सहा बहिणींची कथा यावेळी या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला तूफान प्रतिसाद आला आहे. या चित्रपटातील गाणीही सर्वांच्या पसंतीस उतरली आहेत त्यामुळे हा चित्रपट कधी एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. 

परंतु हा चित्रपट अजून एका कारणासाठी चर्चेत आला आहे की, या चित्रपटातून लोकप्रिय मराठी कलाकार दांपत्याचीही लेक रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. अभिनेते संजय मोने आणि अभिनेत्री सुकन्या मोने यांची लेक ज्युलिया मोने या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसते आहे. तिचा एक ब्लॅक एन्ड व्हाईट ग्रुप फोटो सध्या सगळीकडेच व्हायरल झाला आहे. त्यामुळे सगळीकडेच चर्चा आहे की नक्की या चित्रपटातून ज्युलिया ही डेब्यू करणार आहे की नाही.  'बाईपण भारी देवा' या चित्रपटाच्या निमित्ताने या चित्रपटाच्या टीमशी 'झी 24 तास'नं बातचीत केली तेव्हा याबद्दल खुद्द अभिनेत्री सुकन्या मोने यांनी खुलासा केला आहे. सध्या ज्युलिया ही परदेशात शिक्षण घेते आहे. मध्यंतरी सुकन्या मोने यांनी ज्युलियाच्या वाढदिवसाला तिची एक पोस्ट शेअर केली होती. जेव्हा ती परदेशात शिकायला गेली असल्याचे त्यांनी लिहिले होते. 

सुकन्या मोने यांनी सांगितलं की, ''मी तिला या चित्रपटाच्या रोलसाठी अजिबात विचारलं नाही. हे तिनं फक्त अजित काका (चित्रपटाचे निर्माते अजित भुरे) आणि केदार काका (केदार शिंदे) यांच्या प्रेमापोटी तिनं या चित्रपटातून कामं केलं आहे. हे दोघंही खरंतर काका म्हण्यापेक्षा तिचे लहानपणीचे मित्र आहेत. ज्यूलियाला या दोघांनी विचारलं आणि तिनं तो निर्णय घेतला आहे. मला माहितीही नव्हतं की ती या चित्रपटातून काम करते आहे. ती एवढी मोठी आहे की ती आता स्वत:चे निर्णय घेऊ शकते. केदार शिंदे आणि अजित भुरे यांनी तिला थेट विचारलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी म्हटलं, ज्यूलिया काम करणं शक्यच नाही. तेव्हा ज्यूलिया म्हणाली हो मी करतेय, त्यांनी मला विचारलंय तर मी नाही कसं म्हणू?''

हेसुद्धा वाचा - 'बाईपण भारी देवा' चित्रपटात 'या' कलाकार दांपत्याची लेक करणार एन्ट्री!

पाहा संपुर्ण मुलाखत -

सुकन्या मोनेंची रिएक्शन काय होती? 

सुकन्या मोने म्हणाल्या की त्यांनाच माहितीच नव्हतं ज्युलिया या चित्रपटात आहे. त्यावर त्या म्हणाल्या, ''खरंतर ज्यूलियाचं मला म्हणाली की, अगं आई, तू माझा फोटो का दिलास. आता मला सगळे विचारतायत की तू कोणी अभिनेत्री आहेस का? ती परदेशात शिक्षण घेते आहे तेव्हा तिकडेच भारतीय मित्र तेव्हा इन्टाग्रामवरून खूप प्रश्न विचारून भांडावून सोडतं आहेत. तिला खरंतर हे सगळं नको होतं परंतु आता हे सगळं तिच्या पदरात पडलं आहे परंतु तिलाही हा चित्रपट करताना खूप मज्जा आली होती. त्यातून ती आम्हाला सर्वांनाच मिस करते आहे कारण ती ऑस्ट्रेलियात आहे. त्यातून आता आम्ही लवकरच सिडनीला जाऊ तेव्हा तिची भेट होईल याची खात्री आहे.'' असं त्या म्हणाल्या.