'जुळून येती रेशीमगाठी' फेम अभिनेत्री विवाहबंधनात अडकली

फोटोला सोशल मीडियावर पसंती

Updated: Feb 18, 2020, 12:12 PM IST
'जुळून येती रेशीमगाठी' फेम अभिनेत्री विवाहबंधनात अडकली  title=

मुंबई : मराठी सिनेसृष्टीत आणखी एक अभिनेत्री विवाहबंधनात अडकली आहे. 'लेक माझी लाडकी', 'जुळून येती रेशीमगाठी' यांसारख्या मालिकांमधून ही अभिनेत्री घराघरात पोहोचली आहे. या अभिनेत्रीने आयुष्यातील महत्वाचा निर्णय घेतला आहे. 

अभिनेत्री सायली देवधर विवाहबद्ध झाली आहे. गायक-संगीतकार गौरव बुरसे याच्याशी तिने लग्नगाठ बांधली आहे. सायलीने आपल्या लग्नाचे फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 sumeetbhokse #navrimilenavryala #SonyMarathi #sharayu #weddingphotography #weddingrings #weddinglook #bride #marathiactress #marathilook #nauwari

A post shared by Sayali Deodhar (@deodharsayali) on

‘काही भावना शब्दात व्यक्त करता येत नाहीत. हे ही असंच काही. शब्द सापडत नाहीत आणि सापडले तरी व्यक्त व्हायला पुरत नाहीत,’ अशी कॅप्शन सायलीने गौरवसोबतच्या फोटोला दिली आहे. 

पारंपरिक महाराष्ट्रीय पद्धतीने सायलीने लग्न केलं असून गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सायलीचा साखरपुडा पार पडला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Throwback.. engagement.

A post shared by Sayali Deodhar (@deodharsayali) on

प्राजक्ता माळीने सायलीच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्राजक्ताने फोटो शेअर करताना बॅचलर ग्रुपमधून आणखी एक बुरूज ढासळला.... असं कॅप्शन दिलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Bachelor group मधला आणखी एक बुरूज़ ढासळला... @deodharsayali  Darling Whatever makes you happy; makes us happy  And we know how much you wanted this since so long... Heartiest congratulations girl . @gauravburse लग्नासाठी आजच्या दिवसाची निवड करून भविष्यातल्या “तू आपली anniversary कशी काय विसरलास?” ह्या संभाव्य वाक्याची शक्यताच नष्ट केल्याबद्दल तुमचेही अभिनंदन  . @shraddha_kakade आता तुमचा नंबर @rachanaburse  #wedding #girlsgang #prajaktamali #saree #पैठण

A post shared by Prajakta Mali (@prajakta_official) on

सायलीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रेक्षकांनी या फोटोंना प्रचंड पसंत केलं आहे.