कंगनाने पंतप्रधान मोदींकडे रमजानसाठी केली 'ही' मागणी; त्यानंतर ट्विट डिलीट

 कंगना तिच्या चित्रपटांमुळे नाही तर वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीचं चर्चेत असते.

Updated: Apr 18, 2021, 10:30 AM IST
कंगनाने पंतप्रधान मोदींकडे रमजानसाठी केली 'ही' मागणी; त्यानंतर ट्विट डिलीट  title=

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. शिवाय कंगना तिच्या चित्रपटांमुळे नाही तर वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीचं चर्चेत असते. कंगना राजकिय, सामाजीक किंवा इतर चालू घडामोडींवर कामय सोशल मीडियाच्या माध्यमातून मत मांडत असते. तिच्या वक्तव्यांमुळे ती कधी ट्रोल होते, तर कधी नेटकरी तिच्या मतांना भरभरून प्रतिसाद देत असतात. 

कंगनाने नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक ट्विट केलं. पण  ते ट्विट तिने तात्काळ डिलिट देखील केलं. पण कंगनाचं हे ट्विट काही क्षणातचं तुफान व्हायरल झालं. ट्विटमध्ये तिने पंतप्रधान मोदींकडे रमजानसाठी केली मागणी केली होती. 'कुंभमेळ्यानंतर आता माननीय पंतप्रधानांना विनंती आहे की रमजानला होणाऱ्या कार्यक्रमांवर देखील बंदी आणावी...' पण कंगनाने ट्विट लगेच डिलीट केलं.

दरम्यान, कोरोना रूग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार कोरोनाची साखळी तोडण्यासाठी युद्ध पातळीवर काम करत आहे. कोरोनाचा संसर्ग रोकण्यासाठी राज्यात अनेक कठोर निर्बंधांसह 1 मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे.