अबोला धरून ती चक्क निघूनच गेली...

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेल्या वादामुळेचं कंगनामध्ये हा बदल झाल्याचं बोललं जातंय....

Updated: Jun 2, 2018, 10:49 AM IST
अबोला धरून ती चक्क निघूनच गेली... title=

मुंबई: बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत आपल्या फटकळ स्वभावासाठी ओळखली जाते....पण कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन कंगनाने आता मात्र जास्त न  बोलायचं ठरवलयं..कंगनाचा नवा सिनेमा मेन्टल है क्याच्या सेटवर याचा प्रत्यय आला..कारण या सिनेमाचं शूट संपताच कंगनाने कुणाशीही न बोलता सरळ घरचा रस्ता धरला...  कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेल्या वादामुळेचं कंगनामध्ये हा बदल झाल्याचं बोललं जातंय.... कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये कंगनाने अभिनेता जिम सर्भच्या एका विवादित जोकवर मस्करी केली होती. या प्रकारामुळे कंगनावर टीकेची झोड उठली होती..त्यामुळेचं कंगनामध्ये हा बदल झाल्याचं बोललं जातंय..

कंगनाचा हटके लूक

कंगना रनौत आणि राजकुमार राव यांची जोडी क्वीन या सिनेमातून प्रथम प्रेक्षकांच्या भेटीला आली. आता जोडी पुन्हा एकदा नव्या सिनेमातून एकत्र झळकणार आहे. या सिनेमाचे नाव आहे मेंटल है क्या? यापूर्वी पोस्टर प्रदर्शित झाले होते. त्यात दोघांचाही अतरंगी अवतार पाहायला मिळाला होता. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. आता सेटवरुन कंगनाचा लूक लीक झाला होता. सेटवर कंगना अतरंगी अवतारात दिसत आहे.

कंगना भलतीच व्यग्र

अभिनेता राजकुमार राव गेल्या काही दिवसांपासून स्त्री सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या सिनेमात राजकुमारसोबत श्रद्धा कपूर झळकणार आहे. तर कंगना 'मणिकर्णिका: द क्‍वीन ऑफ झांसी' च्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. शूटिंगच्या पहिल्या दिवशी कंगना रंगबेरंगी कपड्यांमध्ये स्पॉट झाली. कंगनाशिवाय सेटवर अभिनेत्री अमायरा दस्तूर देखील स्पॉट झाली.