अभिनेत्री कंगना राणावतच्या डोक्याला तलवारीचा घाव

अभिनेत्री कंगना राणावत सिनेमाच्या शुटिंग दरम्यान जखमी झाली आहे, कंगनाच्या डोक्याला तलवार लागल्याने ती जखमी झाली आहे.

Updated: Jul 20, 2017, 07:42 PM IST
अभिनेत्री कंगना राणावतच्या डोक्याला तलवारीचा घाव title=

हैदराबाद : अभिनेत्री कंगना राणावत सिनेमाच्या शुटिंग दरम्यान जखमी झाली आहे, कंगनाच्या डोक्याला तलवार लागल्याने ती जखमी झाली आहे, तलवारबाजीचा सीन सुरू असताना ही घटना घडली. 

हैदराबादेतील अपोलो रूग्णालयात तिला दाखल करण्यात आले आहे, तिच्या डोक्याला तब्बल १५ टाके लागले असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे कंगनाला आणखी काही दिवस हॉस्पिटलमध्येच रहावं लागणार आहे.

अभिनेत्री कंगना रणावत ही मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झासी या चित्रपटाचं शूट सुरू असताना जखमी झाली. तलवारबाजीचा सीन शूट करत असताना,  तलवार कंगनाच्या डोक्याला लागल्याने ती जखमी झाली.