...म्हणून कंगना सेन्सॉर बोर्डवर भडकली

...अखेर चित्रपटाच्या नावात बदल करण्यात आला.

Updated: Jul 4, 2019, 06:13 PM IST
...म्हणून कंगना सेन्सॉर बोर्डवर भडकली title=

मुंबई : बॉलिवूड क्वीन कंगना रानौतच्या आगामी चित्रपटाचं शीर्षक 'मेंटल है क्या?' ऐवजी 'जजमेंटल है क्या?' करण्यात आलं आहे. या चित्रपटात कंगना मानसिक संतूलन बिघलेल्या एका मुलीची भूमिका साकारत आहे. चित्रपटात कंगनासोबत अभिनेता राजकूमार रावही झळकणार आहे. पण चित्रपटाचं शीर्षक बदलण्याच्या सेन्सॉरच्या निर्णयामुळे कंगनाला आपल्या चित्रपटाचं नावं ऐन वेळी बदलावं लागलं आहे. त्यामुळे 'सलमानचा मेंटल चालतो माझा का नाही' असा सवाल कंगनाने सेन्सॉर बोर्डाला केला आहे.

येत्या २६ जुलै रोजी कंगना रानौत आणि राजकुमार राव स्टारर 'जजमेंटल है क्या?' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. परंतु चित्रपटाच्या नावातील 'मेंटल' या शब्दाला सेन्सॉर बोर्डने विरोध केल्याने अखेर चित्रपटाच्या नावात बदल करण्यात आला. 

काही मानोसोपचार तज्ञांनी चित्रपटाच्या नावातील मेंटल शब्दाला विरोध दर्शवला. यामुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत तक्रार करण्यात आली होती. अखेर सेन्सॉर बोर्डाने मेंटल शब्द बदलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता 'मेंटल है क्या?' ऐवजी 'जजमेंटल है क्या?' या शीर्षकाने चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सलमानचा मेंटल चित्रपट चालला, माझा का नाही? मलाच अशा प्रकारची वागणूक का दिली जाते? असं म्हणत कंगणाने सेन्सॉर बोर्डवर संताप व्यक्त केला आहे.