कंगना साकारणार कबड्डीपटूची भूमिका

'पंगा'मधून कंगनाचा नवीन अंदाज प्रेक्षकांच्या भेटीला 

Updated: Mar 8, 2019, 01:33 PM IST
कंगना साकारणार कबड्डीपटूची भूमिका title=

मुंबई : यंदा प्रजासत्ताकदिनी अभिनेत्री कंगना रनौतच्या 'मणिकर्णिका: द क्विन ऑफ झांसी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. कंगनाचा वेगळाच लुक या चित्रपटात पाहायला मिळाला होता. त्यानंतर आता पुन्हा कंगना एका नवीन चित्रपटातून, नवीन अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कंगनाच्या आगामी 'पंगा' चित्रपटाचा फर्स्टलूक आणि प्रदर्शनाची तारिख निश्चित करण्यात आली आहे.

कंगना आगामी 'पंगा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पंगा' चित्रपट राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटू यांच्यावर आधारित आहे. चित्रपटात कंगना कबड्डी खेळताना दिसणार आहे. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनी कंगनाच्या या आगामी चित्रपटाचा फर्स्टलूक आणि प्रदर्शनाची तारिख शेअर केली आहे. 'पंगा' २४ जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कंगनासोबत प्रसिद्ध पंजाबी अभिनेता जस्सी गिल स्क्रिन शेअर करणार आहे. कंगनाचा जस्सी गिलसोबत हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटात जस्सी गिल कंगनाच्या पतीची भूमिका साकारणार आहे. जस्सीव्यतिरिक्त चित्रपटात ऋचा चड्ढा आणि नीना गुप्तादेखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 

कंगनाने 'मणिकर्णिका: द क्विन ऑफ झांसी'मधून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. तिने केलेल्या दिग्दर्शनाचं मोठं कौतुक करण्यात आलं. परंतु त्यासोबत तिला अनेकांकडून विरोधही करण्यात आला. चित्रपट प्रदर्शनानंतरही कंगनाचे याबाबत वाद सुरूच आहेत. कंगनाचा बहुचर्चित 'मेंटल है क्या' चित्रपट येत्या मे महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून पाच वर्षांनंतर राजकुमार राव आणि कंगनाची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.