कंगनाचा 'धाकड' लूक व्हायरल

कंगनाचा 'धाकड' लूक व्हायरल, चित्रपटाचा फर्स्ट पोस्टर प्रदर्शित

Updated: Jul 6, 2019, 03:36 PM IST
कंगनाचा 'धाकड' लूक व्हायरल title=

मुबंई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सध्या तिच्या आगामी 'जजमेंटल है क्या' चित्रपटामुळे चर्चेत आहे. याच दरम्यान कंगना पुन्हा एकदा तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. कंगनाने 'धाकड'चं फर्स्ट पोस्टर शेअर करत या चित्रपटाबाबत घोषणा केली आहे. या पोस्टरमध्ये कंगना आगीच्या ज्वाळांमध्ये हातात बंदुक घेऊन उभी असल्याचं दिसत आहे. कंगनाचा हा बॅक लूक तिच्या 'रिवॉलवर रानी'ची आठवण करुन देतोय.

कंगनाने आगामी 'जजमेंटल है क्या' चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच तिच्या अॅक्शन चित्रपटाची घोषणा करत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रजनीश रेजी घई करणार आहेत. 

महिला प्रधान अॅक्शन 'धाकड'चं शूटिंग भारताव्यतिरिक्त साउथ इस्ट एशिया, मिडिल इस्ट आणि यूरोपमध्येही करण्यात येणार आहे. २०२० मध्ये चित्रपटाचं शूटिंग सुरु करण्यात येणार असून दिवाळीमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.