कंगनाच्या आयुष्यात झाले 'या' चिमुकल्याचे आगमन!

बॉलिवूडची क्वीन कंगना राणावत हिच्या आयुष्यात एक सुखद घटना घडली आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 16, 2017, 04:42 PM IST
कंगनाच्या आयुष्यात झाले 'या' चिमुकल्याचे आगमन! title=

नवी दिल्ली : बॉलिवूडची क्वीन कंगना राणावत हिच्या आयुष्यात एक सुखद घटना घडली आहे. कंगनाची मोठी बहीण रांगोली हिने मुलाला जन्म आहे. रांगोलीने स्वतः बाळासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. बाळाचे नाव पृथ्‍वीराज ठेवण्यात आले आहे. बाळासोबतचा फोटो शेअर करताना तिने लिहिले की, "मित्रांनो, भेटा माझ्या मुलाला पृथ्‍वीराज चंडेल याला,"

रंगोलीने बाळाचा अजून एक फोटो शेअर केला. त्यात तिने लिहिले, "माझं छोटसं बाळ."

अलीकडेच हृतिक रोशन सोबत झालेल्या वादामुळे कंगना चांगलीच चर्चेत आली होती. आपल्या जिद्दी आणि स्पष्टवक्तेपणाबद्दल प्रसिद्ध असलेली कंगना आता मावशी झाली आहे. कंगनाची खासियत म्हणजे ती आपले विचार न घाबरता बेधडकपणे मांडते.