'मेंटल है क्या' च्या सेटवरुन कंगणाचा अतरंगी लूक व्हायरल...

कंगना रनौत आणि राजकुमार राव यांची जोडी क्वीन या सिनेमातून प्रथम प्रेक्षकांच्या भेटीला आली. 

Updated: May 18, 2018, 11:17 AM IST
'मेंटल है क्या' च्या सेटवरुन कंगणाचा अतरंगी लूक व्हायरल... title=

मुंबई : कंगना रनौत आणि राजकुमार राव यांची जोडी क्वीन या सिनेमातून प्रथम प्रेक्षकांच्या भेटीला आली. आता जोडी पुन्हा एकदा नव्या सिनेमातून एकत्र झळकणार आहे. या सिनेमाचे नाव आहे मेंटल है क्या? यापूर्वी पोस्टर प्रदर्शित झाले होते. त्यात दोघांचाही अतरंगी अवतार पाहायला मिळाला होता. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. आता सेटवरुन कंगनाचा लूक लीक झाला होता. सेटवर कंगना अतरंगी अवतारात दिसत आहे.
अभिनेता राजकुमार राव गेल्या काही दिवसांपासून स्त्री सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात राजकुमारसोबत श्रद्धा कपूर झळकणार आहे. तर कंगना 'मणिकर्णिका: द क्‍वीन ऑफ झांसी' च्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. शूटिंगच्या पहिल्या दिवशी कंगना रंगबेरंगी कपड्यांमध्ये स्पॉट झाली. कंगनाशिवाय सेटवर अभिनेत्री अमायरा दस्तूर देखील स्पॉट झाली.

kangana ranuat

मेंटल है क्या ची सुरूवात

राजकुमारने क्लॅपबोर्डचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, "पहिला दिवस, या सुरु करु मेंटल है क्या. एकता कपूर, कंगना रनौत, प्रकाश कोवेलमुडी, कनिका ढिल्लों, रुचिका कपूर." बालाजी टेलीफिल्म्स लिमिटेडअंतर्गत सह-प्रस्तूत करत असलेली निर्माती एकता कपूरने ट्वीट केले की, ओह ये! जय माता दी. मेंटल है क्या.

हे करणार सिनेमाचे दिग्दर्शन

सिनेमाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेता निर्माता प्रकाश कोवेलमुडी करत आहेत. तर कनिका ढिल्लों यांनी हा सिनेमाचे लेखन केले आहे.