श्रावणापूर्वीच भोलेनाथाच्या दर्शनासाठी पोहचली कंगणा...

बॉलिवूडची क्वीन कंगणा रानौत पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर धमाल करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Updated: Jul 25, 2018, 11:45 AM IST
श्रावणापूर्वीच भोलेनाथाच्या दर्शनासाठी पोहचली कंगणा... title=

मुंबई : बॉलिवूडची क्वीन कंगणा रानौत पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर धमाल करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंगना रानौत 'मणिकर्णिका: द क्‍वीन ऑफ झांसी' हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या कंगनाने आपल्या बीझी शेड्युलमधून वेळ काढून भगवान भोलेनाथाचे दर्शन घेतले. सध्या कंगना कोयंबटूरच्या आदिशक्ती आश्रमात आहे. तिथले फोटोज तिने इंस्टाग्रामवर शेअर केले.

शेअर केलेल्या फोटोत कंगना रानौत शिवलिंगाची पूजा करताना दिसत आहे. कंगनाने साडी नेसली असून कोयंबटूर स्थित ईशा फाऊंडेशनच्या हेडक्वार्टरमध्ये भगवान शिवचे दर्शन घेत आहे.

पहा कंगनाचे हे खास फोटोज...

 

#KanganaRanaut spends time in the #Adishakti ashram soaking in the divine at @isha.foundation She appears to be in spiritual bliss :) @sadhguru Pic credit : Swami Chitranga

A post shared by Kangana Ranaut (@team_kangana_ranaut) on

कंगनाने नुकतेच मेंटल है क्या सिनेमाचे लंडनमधील शूटिंग पूर्ण केले. पण सध्या 'मणिकर्णिका: द क्‍वीन ऑफ झांसी' सिनेमाची चर्चा आहे. या सिनेमाचा टीझर १५ ऑगस्टला अक्षय कुमारच्या गोल्ड सिनेमासोबत सिनेमागृहात दिसेल. हा सिनेमा पुढल्या वर्षी २५ जानेवारीला प्रदर्शित होईल.