श्रीदेवीच्या आठवणीत जान्हवीला अश्रू अनावर ...

भारताची पहिली सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवीचा 55 वा वाढदिवस होता. 

Updated: Aug 14, 2018, 12:16 PM IST
श्रीदेवीच्या आठवणीत जान्हवीला अश्रू अनावर ...  title=

दिल्ली : भारताची पहिली सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवीचा 55 वा वाढदिवस होता. मृत्यूपश्चात श्रीदेवींचा पहिला वाढदिवस असल्याने कपूर कुटुंबीय भावूक झाले होते. श्रीदेवींच्या जयंतीचे औचित्य साधून माहिती आणि प्रसारण मंत्रालयानेही त्यांच्या चित्रपटाचे खास स्क्रिनिंग आयोजित केले होते.  

अश्रू अनावर  

श्रीदेवींच्या आठवणी पुन्हा जागवण्यासाठी 'मिस्टर इंडिया' या श्रीदेवींच्या अजरामर चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले. यावेळेस बोनी कपूर, खुशी कपूर आणि जान्हवी कपूर उपस्थित होत्या. स्क्रिनिंगनंतर कपूर कुटुंबीय भावूक झाले होते. 

कार्यक्रमादरम्यान जान्हवी कपूरला अश्रू अनावर झाले होते. त्याचा एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर शेअर झाला आहे. 

बॉलिवूडमध्ये एन्ट्री 

जान्हवी कपूर काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. सैराट या सुपरहीट मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक असलेला 'धडक' हा सिनेमा बॉक्सऑफिसवर तुफान कामगिरी करत आहे. जगभरात बॉक्सऑफिसवर दमदार कामगिरी करणार्‍या 'धडक' मधून जान्हवीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण झालं आहे.

स्क्रिनिंगनंतरच्या कार्यक्रमामध्ये बोनी कपूरही बोलताना भावूक झाले. श्रीदेवी उत्तम कलाकार होती. आता रसिकांकडून आम्हांला जसे प्रेम मिळाले तसेच आमच्या मुलांनाही मिळावे अशी अपेक्षा व्यक्ती केली. सोबतच या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबतही आभार व्यक्त केले.