VIDEO : ....म्हणून प्रभास लग्न करणार नाही

काय असेल यामागचं मुख्य कारण? 

Updated: Dec 24, 2018, 09:54 AM IST
VIDEO : ....म्हणून प्रभास लग्न करणार नाही  title=

मुंबई : यंदाचं वर्ष हे लग्नसराईचं वर्ष होतं. मुख्य म्हणजे कालाकारांच्या गप्पांच्या चर्चांमध्येही लग्नाचेच विषय पाहायला मिळाले. यात आता अनेक तरुणींच्या मनाचा ठाव घेणाऱ्या अभिनेता प्रभास आणि राणा डग्गुबती यांच्याही नावाचा समावेश झाला आहे. 

'कॉफी विथ करण' या लोकप्रिय चॅट शोवर आलं असता प्रभास, राणा डग्गुबती आणि दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी थेट प्रभासच्या लग्नावरही चर्चा केल्याचं पाहायला  मिळालं. मुख्य म्हणजे राजामौली यांनी राणा आणि प्रभास या दोघांचीही पोलखोल केल्याचं या चॅट शोमध्ये पाहायला मिळालं. ज्यामध्ये प्रभास आणि राणाच्या लग्नाचा विषयही चर्चेत आला. प्रभास लग्न करणार नाही, असं वक्तव्य राजामौली यांनी करणशी गप्पा मारताना केलं. तो लग्न का करणार नाही, यामागचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं. 

'राणा आधी लग्न करेल पण, प्रभास नाही. कारण तो फार आळशी आहे. त्यातही मुलगी शोधणं, पालकांशी चर्चा करणं, ही सर्व प्रक्रिया त्याच्यासाठी जास्तीचीच असेल. त्याचे आई-वडील कोणा एका मुलीसोबत 'मुव्ह इन' होण्यालाही थेट परवानगी देणार नाहीत', असं म्हणत एकंदर परिस्थिती पाहता आणि प्रभासचा आळशीपणा पाहता तो लग्न करणारच नाही असं राजामौली यांनी स्पष्ट केलं. 

याउलट राणा डग्गुबतीचा स्वभाव आणि आयुष्य जगण्याची पद्धत ही फार साचेबद्ध आहेत्यामुळे लग्नही त्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक असेलच असं राजामौली म्हणाले. यावेळी प्रभासने कोणतीच प्रतिक्रिया न देता तो फक्त मिश्किलपणे हसताना दिसला. 

 
 
 
 

A post shared by Star World (@starworldindia) on

सोशल मीडियावर व्हायरल होणारे या शोचे व्हिडिओ आणि हा संपूर्ण भाग पाहता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील या प्रसिद्ध त्रिकूटाने गप्पांचा चांगलाच फड रंगवला असं म्हणायला हरकत नाही.