तैमूरच्या भावाचं खरं नाव आलं समोर, करीनाने सांगितलं या मागचं कारण

करीना-सैफने दुसऱ्या बाळाबद्दल घेतला महत्वाचा निर्णय 

Updated: Aug 10, 2021, 08:06 AM IST
तैमूरच्या भावाचं खरं नाव आलं समोर, करीनाने सांगितलं या मागचं कारण  title=

मुंबई : करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) च्या मोठ्या मुलाच नाव तैमूर अली खान (Taimur Ali Khan) च्या नावाची घोषणा केली तेव्हा तो वादाचा मुद्दा ठरला. एवढंच नव्हे तर तैमूर अगदी कमी वयातच लाइमलाइटमध्ये आला. (Kareena Kapoor Khan – Saif Ali Khan Name Their Second Baby Jehangir, Jeh is The Nickname) यामुळेच करीना आणि सैफने महत्वाचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या मुलाला या दोघांनी लाइमलाइट आणि सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. 

याचवर्षी फेब्रुवारीमध्ये करीना आणि सैफ दुसऱ्यांदा पालक झाले आहेत. या दोघांच्य दुसऱ्या बाळाचं नाव काय असेल? यावर चर्चा रंगली. अशी चर्चा होती की, करीनाने आपल्या दुसऱ्या मुलाचं नाव 'जेह' असं ठेवलं आहे. मात्र हे खरं नाही. आता करीनाने आपल्या दुसऱ्या मुलाचं ठेवलेलं खरं नाव समोर आलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

करीनाकडून चाहत्यांना आणखी एक सरप्राईज 

चाहत्यांना करीनाने एक सरप्राइज दिलं आहे. मात्र यामध्ये सैफ आणि करीनाने आपल्या बाळांचा चेहरा दाखवला नाही. करीनाने आपल्या पुस्तकात शेवटच्या पानावर जहांगीरचा फोटो दाखवला आहे. 

चेहरा लपवून शेअर केला फोटो 

करीनाने हल्लीच तैमूर आणि आपल्या दुसऱ्या बाळाचा फोटो शेअर केलाय. यामध्ये दुसऱ्या बाळाच्या फोटोवर इमोजी लावला आहे. या कोलाजमध्ये तैमूरचा लहानपणीचा फोटो आणि दुसऱ्या बाळाचा आताचा फोटो लावण्यात आला आहे. या कोलाजसोबत लिहिलं होतं की,'माझी प्रेग्नेंसी माझ्या मुलांशिवाय अपू्र्ण आहे. तुम्हीच माझी ताकद आहात. माझं जग आणि माझा गर्व देखील आहात.'

करीनाच्या दुसऱ्या मुलाचं नाव 'जेह' नाही तर... 

करीनाने दुसऱ्या बाळाचं नाव "जेह' ठेवल्याची चर्चा रंगली. मात्र हे नाव खरं नाही. करीनाने 'जहांगीर' असं बाळाचं नाव ठेवलं आहे. जहांगीरला सोशल मीडिया आणि लाइमलाइटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीना आणि सैफ करत आहेत.