करीना असतानाही सैफसाठी 'तिचा'च शब्द अखेरचा, खुद्द करीनाकडूनच याबाबतचा खुलासा....

करीनाकडून पर्सनल निर्णयावरुन मोठा खुलासा...

Updated: Aug 13, 2021, 03:43 PM IST
 करीना असतानाही सैफसाठी 'तिचा'च शब्द अखेरचा, खुद्द करीनाकडूनच याबाबतचा खुलासा....  title=

मुंबई : सारा अली खान तिचे वडील सैफ अली खान आणि पत्नी करीना कपूर खान यांच्यासोबत खूप चांगलं बॉन्डिंग शेअर करते. सारा अनेकदा तिची सावत्र आई करीनासोबतच्या नात्याबद्दल बोलते आणि तिच्या टॉक शोमध्ये व्हॉट वुमन वॉण्ट मध्येही सहभाग घेतला होता. करीनाही साराला तिच्या मैत्रिणीसारखी वागणूक देते आणि तिच्या करिअरबद्दल सारा तिचा सल्ला घेते.

एकदा एका मुलाखतीत करीनाने साराचं कौतुक केलं होतं आणि सांगितलं होतं की, साराने तिचा एक निर्णय कसा बदलला. 2012 मध्ये, लग्नानंतर, करीना आणि सैफने ठरवलं होतं की, ते पडद्यावर किसिंग सीन देणार नाहीत. जेव्हा त्यांनी साराशी याविषयी चर्चा केली, तेव्हा साराने त्यांना त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला. करीना म्हणाली होती, बहुतेक लोकांना माहित नाही की, ती एकमेव होती ज्यांच्याशी आम्ही यावर चर्चा केली.

सैफने साराला सांगितलं की, मी आणि करीनाने आता पडद्यावर किसींग सीन न देण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा साराने हे ऐकलं तेव्हा तिला धक्का बसला आणि ती म्हणाली की, हा एक अतिशय बालिश निर्णय आहे. कारण तुम्ही दोघेही कलाकार आहात आणि तुम्हाला माहित आहे की, आजकाल बनणाऱ्या चित्रपटांमध्ये, दोन पात्रं नातेसंबंधात असतील तर कोणीही ते चुकीचं मानत नाही.  

करीना पुढे म्हणाली, मी आणि अर्जुन 'द एंड' चित्रपटात पती -पत्नीच्या भूमिकेत होतो, त्यामुळे मी सांगू शकले नाही. की मी किसींग सिन देणार नाही मग सारा आम्हाला म्हणाली की, तुम्ही दोघांनीही ऑन स्क्रीन किसींगचा घेतलेला निर्णय बदलायला हवा. सारा सैफ आणि अमृता सिंग यांची मुलगी आहे. दोघांचा घटस्फोट झाला, त्यानंतर सैफने करीनासोबत दुसरं लग्न केलं.