Hrithik Roshan च्या बहिणीला डेट करतोय कार्तिक आर्यन? मोठा उलगडा

Hrithik Roshan च्या बहिणीसोबत बहरतंय कार्तिक आर्यनचं प्रेम; एकत्र वेळ घालवण्यासाठी करतात असं काम?  

Updated: Nov 8, 2022, 08:32 AM IST
Hrithik Roshan च्या बहिणीला डेट करतोय कार्तिक आर्यन? मोठा उलगडा title=

Kartik Aaryan Dating Hrithik Roshan Cousin : बॉलिवूडमध्ये प्रवेश करताच अभिनेता आर्यन खानने झगमगत्या विश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सिनेमे, अभिनयातून चाहत्यांच्या पसंतीस पडलेल्या कार्तिकचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत देखील जोडण्यात आलं. ज्यामुळे अभिनेत्याच्या नावाची तुफान चर्चा रंगली. आता देखील एका महत्त्वाच्या कारणामुळे कार्तिक चर्चेत आला आहे. रंगणाऱ्या चर्चांमागे कारण देखील तसंच आहे.  (pashmina roshan hrithik roshan)

आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत अभिनेता कार्तिक आर्यनचं नाव जोडण्यात आलं आहे. पण आता चक्क अभिनेता हृतिक रोशनच्या बहिणीसोबत कार्तिक रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगत आहेत. असंख्य मुलींच्या मनावर राज्य करणाऱ्या कार्तिकच्या मनात मात्र हृतिकची बहिण पशमीना रोशन (pashmina roshan) राज्य करते. 

मिळालेल्या माहितीनुसार  पशमीना रोशन आणि कार्तिक आर्यन यांच्या भेटण्याचं प्रमाण वाढलं आहे.  पशमीना आणि कार्तिक यांच्यात असलेली मैत्री आता वेगळं वळण घेताना दिसत आहे. शिवाय अभिनेता पशमीनाला भेटण्यासाठी देखील उत्सुक असतो. एवढंच नाही तर, पापाराझींचं लक्ष वळवण्यासाठी दोघे त्यांच्या ड्रायव्हरसोबत बाहेर पडतात. (hrithik roshan sister pashmina)

कार्तिक आर्यन आणि पशमीनाच्या नात्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगायला लागल्यापासून अभिनेत्याच्या चाहत्यांना पशमीना रोशनबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. पशमीना रोशन ही हृतिक रोशनची चुलत बहीण आहे.

पशमीना अभिनेत्री नसली तरी, सोशल मीडिायवर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. (pashmina roshan bollywood debut) पशमीना रोशन लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण (pashmina roshan bollywood) करणार आहे. शाहिद कपूरच्या 'इश्क विश्क'च्या सिक्वेलमध्ये पशमीना रोशनला कास्ट करण्यात आलं आहं.