Happy Birthday Kartik Aaryan: 16 व्या वर्षी प्रेमात पडला, पण एका गोष्टीच्या भीतीमुळे...

Kartik Aaryan's Birthday: फार कमी लोकांचं पहिले प्रेम पूर्ण होतं..., कार्तिक आर्यनचं 16 वर्षातलं प्रेम तुम्हाला माहित आहे? खुद्द अभिनेत्याने दिली कबुली  

Updated: Nov 22, 2022, 04:30 PM IST
Happy Birthday Kartik Aaryan: 16 व्या वर्षी प्रेमात पडला, पण एका गोष्टीच्या भीतीमुळे... title=

Happy Birthday Kartik Aaryan :  बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणजे अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan). आज कार्तिक बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. आज अभिनेता 32 वा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करत आहे. अनेक भूमिका साकारत यशाच्या उच्च शिखरापर्यंत पोहचलेला अभिनेता खासगी आयुष्याबाबत लवकर भाष्य करत नाही. पण एका शोमध्ये अभिनेत्याने त्याच्या पहिल्या गर्लफ्रेंडबद्दल सांगितलं. (Kartik Aaryan life style)

वयाच्या 16 व्या वर्षी कार्तिक पहिल्यांदा प्रेमात पडला. विनोदवीर कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा' शोमध्ये कार्तिकने (kartik aaryan updates) पहिल्या गर्लफ्रेंडसोबत आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं. पण यावेळी अभिनेत्याने पहिल्या गर्लफ्रेंडचं नाव घेतलं नाही. (kartik aaryan latest news)

'द कपिल शर्मा' शोमध्ये जेव्हा प्रेमाबद्दल अनेक गोष्टी रंगत गेल्या, तेव्हा कार्तिकने देखील स्वतःच्या आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले. अभिनेता म्हणाला, '16 व्या वर्षी मला पहिल्यांदा प्रेम झालं आणि आम्ही जेव्हा फिरायला जायचो तेव्हा मला भीती वाटायची की कोणी आम्हाला पाहणार तर नाहीना...' 

वाचा | Happy B'day : Kartik Aaryan चं खरं नाव काय? अभिनेता गडगंज संपत्तीचा मालक

वयाच्या 16 व्या वर्षी झालेलं प्रेम कार्तिकच्या आयुष्यात जास्त दिवस राहिलं नाही. पण आता कार्तिकचं (kartik aaryan love life) नाव बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. आता कार्तिक अभिनेता हृतिक रोशनच्या बहिणीला डेट करत असल्याची माहिती मिळत आहे. 

कार्तिक आर्यनची गर्लफ्रेंड

अनेक अभिनेत्रींसोबत अभिनेता कार्तिक आर्यनचं नाव जोडण्यात आलं आहे. पण आता चक्क अभिनेता हृतिक रोशनच्या बहिणीसोबत कार्तिक रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगत आहेत. (pashmina roshan-Kartik Aaryan) असंख्य मुलींच्या मनावर राज्य करणाऱ्या कार्तिकच्या मनात मात्र हृतिकची बहिण पशमीना रोशन (pashmina roshan) राज्य करते. 

कार्तिक आर्यन आणि पशमीनाच्या नात्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगायला लागल्यापासून अभिनेत्याच्या चाहत्यांना पशमीना रोशनबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. पशमीना रोशन ही हृतिक रोशनची चुलत बहीण आहे.