Missing : बॉलिवूड अभिनेता अनेक वर्षांपासून बेपत्ता; आता मुलीच्या बोल्ड फोटोंमुळे पुन्हा सुरुये चर्चा

 हा चेहरा एकाएकी प्रेक्षकांच्या गराड्यातून आणि कलाजगताच्या झगमगाटातून दिसेनासा झाला. 

Updated: Jun 15, 2022, 02:17 PM IST
Missing : बॉलिवूड अभिनेता अनेक वर्षांपासून बेपत्ता; आता मुलीच्या बोल्ड फोटोंमुळे पुन्हा सुरुये चर्चा  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूड अभिनेता राज किरण (Raj Kiran) आठवतोय का तुम्हाला? हा तोच अभिनेता ज्यानं 'कर्ज' या चित्रपटामध्ये रवी वर्माची भूमिका साकारली होती. एकेकाळी रुपेरी पडद्यावर गाजणारा हा चेहरा एकाएकी प्रेक्षकांच्या गराड्यातून आणि कलाजगताच्या झगमगाटातून दिसेनासा झाला. 

काही वर्षांपूर्वी अशीही माहिती समोर आली होती, की तो अटलांटामधील एका मनोचिकित्सक केंद्रामध्ये असल्याची माहिती समोर आली होती. पण, याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. (Karz fame missing actor raj kiran daughter Viral photos)

किंबहुना अद्यापही तो कुठं आहे याची माहिती मिळूच शकलेली नाही. बऱ्याच वर्षांपूर्वी तो नाहीसा झाला, तो आजतागायत कोणासमोरही आलेला नाही. 

80 च्या दशकात राजनं त्याच्या अभिनयाचा चांगलाच प्रभाव पाडला होता. राज सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत झळकला असला तरीही त्याची लोकप्रियता मात्र आघाडीच्या अभिनेत्यांना टक्कर देईल अशीच होती. 

एकाएकी राजच्या नावाची चर्चा होण्याचं कारण ठरत आहे त्याच्या मुलीचे व्हायरल होणारे फोटो. राजची लेक रिशिका महतानी शाह (Rishika Mahtani Shah) हिनं स्वत:ला कायमच प्रसिद्धीझोतापासून दूर ठेवलं. आपले वडील अटलांटामध्ये असल्याच्या चर्चा झाल्या तेव्हा तिनं या अफवा असल्याचं स्पष्ट केलं होतं. 

आता याच रिशिकाचे फोटो नव्यानं व्हायरल होत आहेत. ती ज्वेलरी डिझायनर आणि ब्लॉगर आहे. सोशल मीडियावरही ती बऱ्यापैकी सक्रिय आहे. प्रसिद्धीपासून दूर असली तरीही ती बोल्डनेसच्या बाबतीत बऱ्याच बॉलिवूड अभिनेत्रींहूनही वरचढ आहे. 

2014 मध्ये तिनं प्रियकर रवी शाह याच्याशी लग्न केलं. याआधी बऱ्याच दिवसांपासून ते दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. 

राज किरणसोबत नेमकं काय घडलं? 
कारकिर्दीत अपयश मिळाल्यामुळं राज किरण नैराश्याचा सामना करत होता. कुटुंबातही सततचे वाद, पत्नीनं सोडून जाणं या साऱ्याचा त्याच्या मानसिकतेवर परिणाम झाला. असंही म्हणतात की, वाईट परिस्थितीमुळे त्यानं न्यूयॉर्कमध्ये टॅक्सी चालवूनही पोट भरलं होतं. आजपर्यंत हा अभिनेता नेमका कुठे गेला हे कळू शकलेलं नाही हीच शोकांतिका.