भारत सिनेमात प्रियंकाऐवजी दिसणार 'ही' अभिनेत्री?

गेल्या काही दिवसांपासून देसी गर्ल प्रियंका चोप्रा बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार अशी चर्चा होती. 

Updated: Jul 27, 2018, 02:41 PM IST
भारत सिनेमात प्रियंकाऐवजी दिसणार 'ही' अभिनेत्री? title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देसी गर्ल प्रियंका चोप्रा बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार अशी चर्चा होती. प्रियंकाने सलमान खानसोबत अली अब्बास जफरचा भारत सिनेमा साईन केला होता. पण आता प्रियंका या सिनेमात काम करणार नसल्याची खबर आली आहे. निक जोनससोबत लग्न करण्यासाठी प्रियंका हा सिनेमा सोडत असल्याची चर्चा आहे. प्रियांका चोप्राने 'भारत' सोडला

 निर्मात्यांपुढे मोठा प्रश्न

प्रियंकाने हा सिनेमा सोडल्याने आता प्रियंकाची भूमिका कोण साकारणार हा मोठा प्रश्न निर्मात्यांपुढे उपस्थित झाला आहे. प्रियंकाऐवजी आता कतरिना कैफच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. यापूर्वी देखील प्रियंकाने भारत सिनेमा सोडल्याने तिच्याऐवजी कतरिना या सिनेमा झळकणार, अशी खबर आली होती. पण ती अफवा ठरली. 

पण कतरिनाही व्यस्त

पण सध्या कतरिनाकडे दोन सिनेमे आहेत. शाहरुख खानसोबत झिरो तर आमिरसोबत 'ठग्स ऑफ हिन्दोस्तान' मध्ये ती झळकणार आहे. मग या सगळ्यातून तिला वेळ कसा मिळणार, असा प्रश्न असला तरी सलमान आणि कतरिनाची खास मैत्री सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे कतरिनाला सिनेमात घेण्यासाठी आणि सलमानसोबत काम करण्यासाठी सलमान-कतरिना दोघेही विशेष प्रयत्न करु शकतात. 

तरीही तिला मिळू शकते भूमिका

अली अब्बास जफर आणि सलमान खान या जोडीसह यापूर्वी कतरिनाने 'एक था टाइगर' आणि 'टाइगर जिंदा है' हे दोन सिनेमे केले आहेत. सलमान-कतरिनाच्या जोडीचा चाहतावर्गही प्रचंड आहे. त्याचबरोबर अली अब्बस जफर आणि कतरिनाचे देखील मैत्रीपूर्वक नाते आहे. या सगळ्यामुळे भारत सिनेमातील प्रमुख भूमिका कतरिनाला मिळण्याची शक्यता अधिक आहे. 

वाढदिवसाच्या आधीच सलमानने कतरीनासाठी गायले गाणे, एका नव्या अंदाजात केले WISH