Katrina Kaif च्या मंगळसुत्रावर खिळल्या सगळ्यांच्या नजरा

कतरिनाच्या गळ्यात विकीच्या नावाचं खास मंगळसूत्र 

Updated: Jan 5, 2022, 09:25 AM IST
Katrina Kaif च्या मंगळसुत्रावर खिळल्या सगळ्यांच्या नजरा  title=

मुंबई : Katrina Kaif Flaunt Managlsutra : बॉलिवूड कपल कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) लग्नबंधनात अडकले. दोघांनी लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केलेत. हे फोटो व्हायरल देखील झाले. पण आज चर्चा आहे ती म्हणजे कतरिनाच्या मंगळसूत्राची. कतरिनाने मंगळसूत्र फ्लॉन्ट करत हे खास फोटो पोस्ट केला आहे. 

कतरिना सध्या आपल्या नवीन घरी एन्जॉय करत आहे. या फोटोत कतरिना डेनिम पँटसह झिप्परसोबत दिसत आहे. या फोटोतील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती मंगळसूत्र दाखवत आहे. कतरिनाने फोटो शेअर करताना घर आणि हार्टचा इमोजी शेअर केलाय.

Katrina Kaif के बोल्ड लुक ने ढाया कहर, हीरों से जड़े मंगलसूत्र पर टिकी फैंस की नजर

का खास आहे कतरिनाचं मंगळसूत्र 

कतरिना कैफचे हिऱ्याचे मंगळसूत्र डिझायनर सब्यसांचीच्या बंगाल टायगर कलेक्शनमधील आहे. हे काळ्या आणि सोनेरी मोत्यांनी बनवलेले आहे आणि शेवटी दोन हिरे जोडलेले आहेत. त्यामुळे हे मंगळसूत्र खास आहे. 

कतरिनाने मनापासून स्वीकारली ही गोष्ट 

कतरिनाची आई ख्रिश्चन आहे तर बाबा मुस्लिम. कतरिना ब्रिटनमध्ये जन्मलेली. पाश्चिमात्य देशाचा पगडा कतरिनावर मोठ्या प्रमाणात असल्याचं अनेकदा जाणवतं. मात्र लग्नानंतर कतरिनाने हिंदू धर्म मनापासून स्वीकारला. याच महत्वाचं उदाहरण म्हणजे कतरिनाच्या गळ्यातील मंगळसूत्र. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

कतरिनाने अशी घेतली विकीची काळजी 

नवीन वर्ष साजरे करून विकी कौशल कामावर परतला. विकी आणि कतरिनाच्या लग्नापासूनच चाहते दोघांचे एकमेकांवरील प्रेम पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. (लग्नानंतर विकी मोठ्या संकटात, कतरिनापासून दूर जाण्याची येणार वेळ ?) 

दोघांनी त्यांचे नवीन वर्ष एकत्र साजरे केले आणि आता ते त्यांच्या कामावर परतले आहेत. सेलिब्रेशननंतर जेव्हा कतरिना विकी कौशलला ड्रॉप करण्यासाठी विमानतळावर आली, तेव्हा दोघेचे अनेक फोटो कॅमेऱ्यात कैद झाले. जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.