Fact Check: कतरिनाच्या लंडनमधील व्हिडीओमुळे प्रेग्नेंसीची अफवा

Katrina Kaif Video: बॉलिवूड अभिनेत्री कतरिनाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावरुन ती गरोदर असल्याचा दावा केला जात आहे. परंतु, हा दावा खोटा निघाला आहे.  

मानसी क्षीरसागर | Updated: May 21, 2024, 05:36 PM IST
Fact Check: कतरिनाच्या लंडनमधील व्हिडीओमुळे प्रेग्नेंसीची अफवा title=
Fact Check Katrina Kaif alleged Pregnant Viral Video is fake

Katrina Kaif Video: बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडपे कतरिना कैफ आणि विक्की कौशल हे सध्या लंडनमध्ये सुट्टीसाठी गेले आहेत. विक्की कौशलच्या वाढदिवसासाठी हे मोस्ट लव्हेबल कपल लंडनला सुट्टीचा आनंद घेत आहेत. त्यांचे लंडनमधील फिरतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या फोटोंमध्ये दोघे हातात हात घालून फिरताना दिसत आहे. मात्र, या फोटोत दिसणाऱ्या कतरिनाने सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. एका व्हायरल व्हिडिओत कतरिना गरोदर असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पण असे काहीच नाही.

नेमकं काय घडलं?

कतरिना कैफ गरोदर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होत्या. मात्र, या सगळ्या अफवा असल्याचे समोर आले होते. मात्र आता कतरिना आणि विकीच्या लंडनमधील व्हिडिओवरुन पुन्हा एकदा या चर्चेला उधाण आलं. व्हिडिओ खूप दुरून शूट करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये मात्र, असा दावा करण्यात आला की यात निरखून पाहिल्यास कतरिनाने आपल्या ओव्हरकोटमध्ये बेबी बंप लपवला. तर विकी एका केअरिंग नवऱ्याप्रमाणे तिची काळजी घेत होता. मीडिया रिपोर्ट्सनंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला.

एवढेच नव्हे, तर व्हायरल व्हिडीओमध्ये तिच्या चालण्याच्या पद्धतीवरुनही ती गरोदर असल्याचा तर्क नेटकरी लावत आहेत. तर, अनेकांनी कमेंट करत ती गरोदर आहे का? असा सवाल केला आहे. तर काहींनी त्या दोघांना थोडी प्रायव्हसी द्यावी, असं कमेंट मध्ये लिहलं आहे. अनेकांनी कमेंटमध्ये लिहलं आहे की, कतरिना प्रेग्नेंट आहे. काहींनी तर याही पुढे जाऊन दीपिकाआधी कतरिना बाळाला जन्म देऊ शकते. असेही म्हटले आहे. मात्र, कतरिना आणि विकीवर वर्तवण्यात आलेल्या या सर्व चर्चा खोट्या निघाल्या आहेत. कतरिनाच्या टीमने हा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. तसेच अशा प्रकारच्या अफवा पसरवू नये असे आवाहनही केले आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर कतरिनाची शेवटची पोस्ट 16 मे रोजी होती. तिने पती विकी कौशलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी तिने शुभेच्छा देताना तिने तीन हार्ड इमोजी वापरले होते. तेव्हाही आता लवकरच विकी कौशलकडे छोटा पाहुणा येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यातच आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. 

दीपिका पदुकोणची गुड न्यूज

दरम्यान, लवकरच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांच्या घरात एका चिमुकल्याचे आगमन होणार आहे. अलीकडेच मतदानासाठी पोहोचलेल्या दीपिकाने बेबी बंप फ्लॉन्ट केले होते. सप्टेंबरमध्ये दीपिका बाळाला जन्म देणार आहे. त्यातच आता कतरिनाचाही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत की दीपिकाच्या आधीच कतरिना बाळाला जन्म देऊ शकते.