VIDEO : कतरिना-आमिरचा डान्स व्हिडिओ होतोय वायरल

कतरिना कैफ आणि आमिर खान ही जोडी 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याआधीच या जोडीचा एक डान्स प्रॅक्टीसचा व्हिडिओ वायरल होताना दिसतोय. 

Updated: Mar 16, 2018, 02:49 PM IST
VIDEO : कतरिना-आमिरचा डान्स व्हिडिओ होतोय वायरल  title=

मुंबई : कतरिना कैफ आणि आमिर खान ही जोडी 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याआधीच या जोडीचा एक डान्स प्रॅक्टीसचा व्हिडिओ वायरल होताना दिसतोय. 

अभिनेता आमिर खाननं नुकताच म्हणजेच १४ मार्च रोजी आपला ५३ वाढदिवस सेलिब्रेट केला. यावेळी त्याची सहकलाकार कतरिनानंही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या... हटके अंदाजात... 

यावेळी कतरिनानं सोशल मीडियावर आपला एक डान्स व्हिडिओ शेअर केलाय... आणि काही वेळातच हा व्हिडिओ वारयल झाला. हा व्हिडिओ आत्तापर्यंत १४ लाख ८० हजारांहून अधिक लोकांनी पाहिलाय. 

'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत कतरिना कैफ, फातिमा सना शेख आणि आमिर खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं कथानक १८३९ मध्ये प्रकाशित फिलिम मीडोज टेलरचं पुस्त 'कन्फेशन्स ऑफ ए ठग'वर आधारित आहे.