कतरिना ते करिना 'या' सेलिब्रिटींचे व्हायरल झाले MMS;नावं ऐकून बसेल धक्का

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका शिल्पी राज सध्या चर्चेत आहे. 

Updated: Apr 24, 2022, 05:07 PM IST
कतरिना ते करिना 'या' सेलिब्रिटींचे व्हायरल झाले MMS;नावं ऐकून बसेल धक्का title=

मुंबई : भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका शिल्पी राज सध्या चर्चेत आहे. याचं कारण तिचा एमएमएस लीक झाला आहे. काही दिवसांपूर्वी शिल्पी राजचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये शिल्पी एका व्यक्तीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहे.

मीडिया रिपोर्टमध्ये असाही दावा केला जात आहे की, शिल्पीसोबत दिसणारी ही व्यक्ती दुसरी कोणी नसून तिचा बॉयफ्रेंड विजय चौहान आहे. भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत अशी घटना काही पहिलीच झालेली नाही तर याआधीही अनेक सेलिब्रिटींचे एमएमएस व्हायरल झाले आहेत. तर असाही दावा केला जात आहे की, एमएमएस व्हायरल झाल्यामुळे सेलिब्रिटींना जेलची हवाही खावी लागली.

जरी अनेक प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं MMSस्कँडल सारख्या वादात आली आहेत. ज्यामुळे त्यांना बदनामीला सामोरं जावं लागलं. काही अभिनेत्रींनी त्यांचा व्हायरल एमएमएस फेकंही म्हटलं असलं तरी सर्वसामान्यांमध्ये MMSव्हायरल झाल्यामुळे त्यांच्याबद्दल बरीच चर्चा झाली. 

कतरिना कैफ
2014 साली प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफचा MMSव्हायरल झाला होता. पण कतरिनाने एमएमएस फेक असल्याचं सांगितलं होतं.

करीना कपूर खान
आता करीना कपूर खान आणि शाहिद कपूर या दोघांनीही वेगळं आयुष्य सुरू केलं आहे. पण एक वेळ अशी होती जेव्हा या दोघांच्या अफेअरच्या बातम्या मीडियामध्ये समोर येत होत्या. एकदा करीना आणि शाहिद कपूरचा एका रेस्टॉरंटमध्ये किस करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

प्रीती झिंटा
बॉलिवूडची डिंपल गर्ल प्रीती झिंटाचा बाथरुममधून एमएमएस लीक झाल्याची घटना समोर आली होती. या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता.

मल्लिका शेरावत
बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या बोल्ड सीन्सने चर्चेत आलेली अभिनेत्री मल्लिका शेरावतचा एमएमएस लीक झाला होता. या बातमीने बरीच खळबळ निर्माण झाली होती. मात्र, यानंतर अनेकजणांकडून असंही बोललं जात होतं की, हा व्हिडिओ मल्लिकाचा नसून तिच्यासारखी दिसणाऱ्या दुसऱ्या मुलीचा आहे.

सोनाक्षी सिन्हा
एकदा शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता, मात्र नंतर तो व्हिडिओ खोटा असल्याचं दिसून आलं.