'रॉकी भाई'ने रियल लाईफमध्ये चालवली बंदुक,VIDEO आला समोर

केजीएफ स्टार यश रॉकी भाई जेव्हा खऱ्या आयुष्यात बंदूक चालवतो, पाहा VIDEO

Updated: Sep 29, 2022, 06:51 PM IST
'रॉकी भाई'ने रियल लाईफमध्ये चालवली बंदुक,VIDEO आला समोर  title=

मुंबई : दक्षिण चित्रपटसृष्टीतला दिग्गज अभिनेता केजीएफ (Kgf 2) स्टार यश (Yash) , 'रॉकी भाई' (Rocky Bhai) सोशल मीडिय़ावर नेहमीच अॅक्टीव्ह असतो. सोशल मीडियावर (Social media) व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून तो चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. आता असाच एक त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हि़डिओची सोशल मीडियावर चर्चा आहे. दरम्यान या व्हिडिओत काय आहे ते जाणून घेऊयात. 

अभिनेता यश म्हणजेच 'रॉकी भाई'  (Rocky Bhai) चा केजीएफ (Kgf 2) सिनेमा सुपरडूपर हिट ठरला होता. या सिनेमाच्या दोन्ही भागात त्याने उत्कृष्ट अभिनय केला आहे. या अभिनयामुळेच चाहत्यांमध्ये सिनेमाची एक वेगळी क्रेझ निर्माण झाली होती. आजही या सिनेमाचे डायलॉग प्रेक्षकांच्या ओठावर आहेत. तसेच या सिनेमाचे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 

दरम्यान केजीएफ 2 (Kgf 2) मधील यशचा (Yash) बंदूक चालवताना एक सीन खुप चर्चेत आला होता. हा सीन प्रेक्षकांना खुप आवडला होता. या सीनमध्ये प्रेक्षकांनी यशला सिनेमात बंदूक चालवताना पाहिले होते. मात्र आता खऱ्या आयुष्यात त्याने बंदूक चालवली आहे. या संदर्भातला व्हिडिओ समोर आला आहे.  

व्हिडिओत काय?
यशने (Yash) त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत यश बंदूकीने गोळी झाडताना दिसत आहे. व्हिडिओत त्याने डोळ्यावर शुटींगचा चष्मा घातला आहे, आणि हातात बंदूक घेऊन तो गोळ्या झाडतोय. या व्हिडिओसोबत त्याने एक खास कॅप्शनही लिहिले आहे. तो कॅप्शनमध्ये म्हणतोय, लक्ष्य गाठण्याचा मार्ग नेहमीच असतो, आव्हान असते ते ओळखणे!!

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Yash (@thenameisyash)

दरम्यान यशचा (Yash)  हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर चाहते तुफान कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पाडतोय.