Kiara Advani: कियारा अडवाणीचा कपिल शर्मा शोमध्ये मोठा खुलासा

बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) सध्या नवीन नवीन चित्रपट करतेय. नुकतीच कियारा तिच्या नवीन चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा (Kapil sharma)शोमध्ये आली होती. यावेळी कियारा आडवाणीने तिच्या आयुष्यातील सर्वांत मोठ्या गोष्टीचा खुलासा केला. तिचा हा खुलासा पाहून सहकलाकारही चक्रावले होते. 

Updated: May 11, 2022, 07:58 PM IST
Kiara Advani: कियारा अडवाणीचा कपिल शर्मा शोमध्ये मोठा खुलासा title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) सध्या नवीन नवीन चित्रपट करतेय. नुकतीच कियारा तिच्या नवीन चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा (Kapil sharma)शोमध्ये आली होती. यावेळी कियारा आडवाणीने तिच्या आयुष्यातील सर्वांत मोठ्या गोष्टीचा खुलासा केला. तिचा हा खुलासा पाहून सहकलाकारही चक्रावले होते. 

कपिल शर्माच्या शोमध्ये अनेक कलाकार आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येत असतात. त्याचप्रमाणे बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी, दिग्दर्शक अनीस बज्मी, सहकलाकार कार्तिक आर्यन (Kartik Aryan)आणि राजपाल यादव आले होते.

शोमधील संवादादरम्यान कियाराने आपल्या आयुष्यातील अनेक खुलासे केले. कियारा म्हणते, 'एक गोष्ट सोडली तर मी अजिबात अंधश्रद्धाळू नाही. जोपर्यंत मी चित्रपट साइन करत नाही तोपर्यंत मी कोणालाच सांगत नाही.

'फगली' या कॉमेडी चित्रपटातून कियाराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.  तसेच एम एस धोनी द अनडोल्ड स्टोरी या बायोपिकमध्ये सुद्धा तिने अभिनय केला आहे. त्यानंतर 'लस्ट स्टोरीज' या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले.

तेलुगू पॉलिटिकल थ्रिलर 'भारत अने नेनू' आणि 'कबीर सिंग' आणि 'शेरशाह' सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर तिची बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण झाली. कियाराच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागलीय.