Kili Paul बॉलिवूडनंतर पंजाबी गाण्याच्या प्रेमात, VIDEO आला समोर

Kili Paul चा पंजाबी गाण्यावर जबरदस्त डान्स, VIDEO पाहिलात का तुम्ही? 

Updated: Nov 14, 2022, 12:23 AM IST
Kili Paul बॉलिवूडनंतर पंजाबी गाण्याच्या प्रेमात, VIDEO आला समोर title=

मुंबई : टांझानियाचा प्रसिद्ध सोशल मीडिया सेन्सेशन किली पॉल (Kili Paul) त्याच्या व्हिडिओसाठी खुप प्रसिद्ध आहे. त्याचे व्हिडिओ भारतात जास्त पाहिले जातात, यामागचे कारण म्हणजे, तो बॉलिवूड गाण्यावर सर्वांधिक व्हिडिओ बनवत असतो. त्यात आता तो पंजाबी गाण्याच्याही प्रेमात पडल्याचे दिसत आहे. या संबंधित त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या त्याच्या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. 

किली पॉल (Kili Paul) बॉलिवूडच्या हिंदी गाण्यावर जास्त व्हिडिओ बनवतो, जे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.पण यावेळी किली पॉल (Kili Paul)  त्याच्या पंजाबी व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. पंजाबी गाण्यावरचा त्याचा एक अप्रतिम डान्स व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओची चर्चा रंगली आहे.  
 
किली पॉल (Kili Paul Instagram) हा 'इडा नी चलदे प्यार सोडिये' या सुपरहिट पंजाबी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये डान्ससोबत तो लिपसिंग देखील करत आहे. या व्हिडिओमध्ये शानदार डान्स करताना दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kili Paul (@kili_paul)

किली पॉलने (Kili Paul) त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माझ्या ट्रांजेशनला रेट करा.' किली पॉलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक सोशल मीडिया यूजर्स या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत. 

किली पॉल (Kili Paul Instagram) हा इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवुन प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. त्याचे इंस्टाग्रामवर 2.4 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. आपल्या बहिणीसोबत त्यांने शेरशाह चित्रपट, राता लांबिया, श्रीवल्ली, सामी आणि इतर अनेक गाण्यांवर रील बनवली आहेत.