Kili Paul ने पहिल्यांदा स्वतःच्या आवाजात गायलं बॉलिवूड गाणं, पाहा Video

आतापर्यंत Kili Paul बॉलिवूडच्या गाण्यांवर डान्स करत होता, पण आता तर चक्क गाणं गायला...  

Updated: Oct 30, 2022, 11:07 AM IST
Kili Paul ने पहिल्यांदा स्वतःच्या आवाजात गायलं बॉलिवूड गाणं, पाहा Video title=

Kili Paul Sang Bollywood Song : टांझानियाचा सोशल मीडिया सुपरस्टार कायली पॉल (Kili Paul) कायम बॉलिवूडच्या (Bollywood) गाण्यांवर ठेका धरताना दिसतो. पण  आता मात्र त्याने चक्क पहिल्यांदा गाणं म्हटलं आहे. सोशल मीडिया सुपरस्टार कायली पॉलचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो स्वतःच्या आवाजात बॉलिवूड गाणं गाताना दिसत आहे. सध्या कायलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र कायलीच्या आवाजाची चर्चा आहे. 

व्हिडीओमध्ये कायली अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांच्या 'रब ने बना दी'  (Rab Ne Bana Di Jodi) या हिट सिनेमातील 'तुझ में रब दिखता है' (Tujh Mein Rab Dikhta Hai) हे गाणं गाताना दिसत आहे. कायलीच्या आवाजाला नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर डोक्यावर घेतलं आहे. पाहा व्हिडीओ

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्याचा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. कायली पॉलचे जगभरात अनेक चाहते आहेत. हिंदी गाणी त्यांच्या लिप सिंकमुळे भारतात खूप प्रसिद्ध आहेत. यापूर्वीही तो भारतात येऊन अनेक रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाला आहे. (Kili Paul's fan's on social media)

कोण आहे किली पॉल?
किली पॉल हा एक सोशल मीडिया स्टार असून तो टांझानियाचा आहे. तो कायम बॉलिवूड गाण्यावर रिल्स इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असतो. सोशल मीडिया स्टार असला तरी, एखाद्या प्रसिद्ध सेलिब्रिटीप्रमाणे त्याच्या चाहत्यांची संख्या आहे. इन्स्टाग्रामवर किलीचे 42 लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.  (kelly paul social media)