किंग खानने असं केलं विंग कंमाडर अभिनंदनचं स्वागत

अभिनेता शाहरुख खानने अभिनंदनचं स्वागत केलं आहे.

Updated: Mar 1, 2019, 06:00 PM IST
किंग खानने असं केलं विंग कंमाडर अभिनंदनचं स्वागत  title=

#WelcomeBackAbhinandan: विंग कमांडर अभिनंदन भारतात परतला आहे. पाकिस्तानने भारतीय अधिकाऱ्यांकडे अभिनंदन यांना सोपवलं. वाघा बॉर्डरवर अभिनंदनचं स्वागत करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सोशल मीडियावर देखील नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खानने एक पोस्ट शेअर करुन अभिनंदनचं स्वागत केलं आहे. शाहरुख खानने ट्विटरवर तिरंगा झेंडा पोस्ट करत म्हटलं की, पुन्हा घरी येण्याची भावना काही वेगळीच असते. घर हे प्रेम, स्वप्न आणि आशेचं स्थान असतं. तुमची बहादुरी आम्हाला मजबूत करते. महान... वेलकम बॅक अभिनंदन.

अभिनंदन यांच्या सुटकेनंतर देशाभरात आनंदाचं वातावरण आहे. भारताने अभिनंदची सुटका कोणत्याही अटीशर्तींवर अवलंबून नसल्याचे सांगितले. भारताने केलेल्या दबावानंतर पाकिस्ताकडून अभिनंदन यांची सुटका करण्यात आली. अभिनंदन यांची सुटका केल्याने तणाव कमी होणार असेल तर अभिनंदन यांना शांततेच्या मार्गाने सोडणार असल्याचे पाकिस्तानकडून सांगण्यात आलं आहे.