के.एल.राहुल आणि अथिया शेट्टीचं लवकरच शुभमंगल?

क्रिकेटर के.एल.राहुल आणि सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टीचं लवकरच शुभमंगल? पाहा कुठे आणि कसा होणार शाहीविवाह सोहळा

Updated: Apr 20, 2022, 09:54 AM IST
के.एल.राहुल आणि अथिया शेट्टीचं लवकरच शुभमंगल?  title=

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये लगीनसराई सुरू आहे. आता आणखी एक कपल लग्नबंधनात अडकणार आहे.  क्रिकेटर के.एल.राहुल आणि सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी ही जोडी गेल्या 3 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांनी अनेकदा आपल्या नात्याची कबुलीही दिली आहे.

सोशल मीडियावर त्यांचे एकत्र फोटो अनेकदा व्हायरल झाले आहेत. आता अखेर हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत..याच वर्षाच्या अखेरीस दोघांचा विवाह होईल अशी सूत्रांची माहिती आहे.

सुनील शेट्टी हा मंग्लोरियन तुलू कुटुंबातील आहे. तसंच के.एल.राहुलचं सुद्धा मंगळुरूशी खास नातं आहे. त्यामुळे राहुल आणि अथियाचं लग्न साऊथ इंडियन रितीरिवाजाप्रमाणे होईल असं सांगण्यात येतंय.

डिसेंबर 2022मध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडेल अशी माहिती मिळत आहे. सुनील शेट्टीला याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला त्यावर मात्र सुनीलने यावर कोणतंही भाष्य करण्यास नकार दिला.