आलिया आणि रणबीरच्या लग्नाची तारीख उघड, या अभिनेत्रीकडून खुलासा!

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर बऱ्याच दिवसांपासून ऐकमेकांना डेट करत आहेत.

Updated: Aug 8, 2021, 03:46 PM IST
 आलिया आणि रणबीरच्या लग्नाची तारीख उघड, या अभिनेत्रीकडून खुलासा! title=

मुंबई : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर बऱ्याच दिवसांपासून ऐकमेकांना डेट करत आहेत. एवढंच नाही तर अनेकवेळा त्यांच्या लग्नाच्या बातम्याही चर्चांमध्ये आल्या आहेत. अलीकडेच आलिया आणि रणबीर त्यांच्या नवीन घरात स्पॉट झाले होते.

एका वृत्तानुसार हे या दोघांनी लग्नाचा विचार करुन हे नवं घर खरेदी केलं आहे. वास्तविक, हे कपल लग्न झाल्यानंतर या घरात राहू शकतात. आता अशा अफवा देखील येत आहेत की, हे कपल त्यांच्या लग्नाच्या तयारीमध्ये व्यस्त आहेत.

अनेक सेलेब्सनाही दोघांच्या लग्नाकडे लक्ष वेधलं आहे. त्याचबरोबर बेल बॉटम अभिनेत्री लारा दत्तानेही आलिया आणि रणबीरच्या लग्नाचा खुलासा केला आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा लाराला दोघांच्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तिने सांगितलं की, 'मला खात्री आहे की, दोघंही या वर्षी लग्न करतील.' मात्र आलिया आणि रणबीरने त्यांच्या लग्नाबाबत अजूनही कोणताच खुलासा केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या लग्नाच्या तारखेकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. काही काळापूर्वी रणबीरने लग्नाच्या बातमीवर आपलं मौन तोडलं आणि सांगितलं की, कोरोना महामारीमुळे लग्नाला विलंब होत आहे. त्याचबरोबर आलियाने रणबीरमुळे लवकर लग्न करण्याची वस्तुस्थितीही स्वीकारली आहे.

कुटुंबाच्या खूप जवळ
आलिया आधीच तिची होणारी सासू नीतू कपूर आणि वहिनी रिद्धिमा कपूर यांच्याशी चांगले संबंध ठेवते. एवढंच नाही तर आलिया कपूर कुटुंबाच्या प्रत्येक फंक्शनमध्ये हजेरी लावताना दिसते. त्याचबरोबर रणबीर आलियाची आई सोनी राजदान आणि बहिणीसोबतही अनेकवेळा दिसला आहे.